औरंगाबाद | राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी जमीन बळकावल्याचा आरोप आशाबाई धोंडू बोराडे (रा. धावडा ता. भोकरदन जि. जालना) या महिलेने आज पत्रकार भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
काही दिवसापूर्वी, कॅबिनेट मंत्री संदिपान भुमरे यांच्यावर देखील जमीन बळकावल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर आज ठाकरे सरकारमधील राज्यमंत्री अब्दुल सत्तार व संबंधितांनी जमीन बळकावली असून मंत्रालयासमोर निर्वस्त्र होऊन आंदोलन करण्याचा इशारा देऊन आणि आंदोलनाला गेल्यानंतरही अद्याप पर्यंत न्याय मिळाला नसल्याचा आरोप आशाबाई बोराडे या महिलेने केला आहे.
या तक्रारदार महिलेला अब्दुल सत्तार यांच्या नावाची खरेदी-विक्री केलेले दस्त, आणि इतर दस्त पत्रकारांनी मागितले असता ती पत्रकारांना देण्यात आली नाही.




