पुन्हा दिसणार दादागिरी !! सौरव गांगुली वर येणार बायोपिक; ‘हा’ अभिनेता साकारू शकतो ‘दादा’ ची भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारताचा माजी दिग्गज खेळाडू आणि सध्याचे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर लवकरच बायोपिक निघणार असून गांगुलीच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालं आहे. यापूर्वी महेंद्रसिंह धोनी,सचिन तेंदुलकर आणि मोहम्‍मद अजहरुद्दीन यांच्या जीवनावर आधारित बायोपिक निघाली होती

गांगुली म्हणाला , मी माझ्या जीवनावर बायोपिक बनवण्यास होकार दिला आहे. हा चित्रपट हिंदीत प्रदर्शित होणार असून आताच दिग्दर्शकाचे नाव सांगू शकत नाही. या सर्वासाठी आणखी काही दिवस जातील” समोर आलेल्या माहितीनुसार ही एक बिग-बजेट फिल्म असणार आहे. एखादे मोठे प्रोडक्शन हाऊस तयार करणार असलेल्या या चित्रपटाचे बजेट जवळपास 200 ते 250 कोटीच्या घरात असेल. बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूर गांगुलीची भूमिका निभावू शकतो अशी माहितीही समोर येत आहे

यापूर्वी संजय दत्तच्या बायोपिकमध्येही रणबीर कपूर मुख्य भूमिकेत होता .त्यामुळे तो सौरव गांगुलीच्या बायोपिकसाठी निर्मात्यांची पहिली पसंती असेल. याशिवाय हृतिक रोशनसुद्धा या यादीमध्ये आहे. मुख्य भूमिकेत त्याच्यासारखा दिसणारा एखादा माणूस त्याच्या बायोपिकमध्ये असावा असे दादाने आपल्या शेवटच्या मुलाखतीत सांगितले होते.

Leave a Comment