यवतमाळ जिल्ह्यातील चिंचमंडळ येथे विवाहित महिलेचा विनयभंग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यवतमाळ प्रतिनिधी । मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथील एका ३२ वर्षीय विवाहित महिलेचा येथीलच एका ३१ वर्षीय युवकाने विनयभंग केल्याची तक्रार मारेगाव पोलीसात दाखल करण्यात आली आहे. फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून या घटनेतील संशयीतास अटक करण्यात आली.

मारेगाव पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या चिंचमंडळ येथील एका ३२ वर्षीय विवाहितेचा गावातीलच मनोज चौधरी या ३१ वर्षीय युवकाने शौचास जाताना वाटेत हात पकडून विनयभंग केल्याची तक्रार पिडीताने मारेगाव पोलिसात केली. या पोलिसांनी प्रकरणी भा दं वी कलम ३५४(अ) (ड) अन्वये गुन्हा कायम करण्यात आला असुन संशयित युवकास अटक करण्यात आली आहे. ही घटना दि. १५ जानेवारीचे सायंकाळी ७ वाजताच्या सुमारात घडली असुन घटनेचा तपास पोलीस उपनिरिक्षक अमोल चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली पो.ना.निलेश वाढई करित आहे.