125 बेडच्या बाल कोविड सेंटरचे काम अंतिम टप्प्यात

औरंगाबाद | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने गरवारे कंपनीच्या मदतीने 125 बेडचे बाल कोविड सेंटर उभारणीचे काम हातात घेतले आहे. ते आता अंतिम टप्प्यात येत आहे. 125 बेडची व्यवस्था झाली असून ऑक्सिजनची लाईन टाकने पूर्ण झाली आहे. ऑक्सिजनची प्लांट उभारणीचे काम मात्र बाकी आहे.

कोविड सेंटरच्या भिंतीवर लहान मुलांसाठी चित्रे काढण्यात आली आहे. तसेच त्यांच्या मनोरंजनासाठी दोन एलईडी टीव्ही सुद्धा लावण्यात आले आहे. या कोविड सेंटरवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली आहे.

जळगाव रोडवरील गरवारे कंपनीच्या शेडमध्ये सी एस आर निधीतून हे रुग्णालय उभारण्यात येत आहे. 0 ते 18 या वयोगटातील मुलांवर या ठिकाणी उपचार केले जाणार आहे. या ठिकाणी रुग्ण बालकसोबत एका पालकाची राहण्याची व्यवस्था केली आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त बी. बी. नेमाने, आरोग्य वैद्यकीय अधिकारी नीता पाडळकर, आरोग्य अधिकारी डॉक्टर बाळकृष्ण राठोडकर यांनी येथे नुकतीच पाहणी केली आहे.

You might also like