हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीमुळे कोरोना बाधितांचे प्रमाण वाढत आहे. राज्यात वाढत असलेल्या रुग्णवाढीबाबत आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माहिती दिली. अनेक जिल्ह्यात कोरोनाची रुग्णवाढ आहे. तरी सध्या ज्यांनी दोन ढोस घेतले आहेत त्यांना फिरण्यासाठी मुभा द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेल्यानंतर त्यांच्याकडे करणार आहे. मात्र, राज्यात अजून १०० ते १२० दिवस महत्वाचे आहेत. कोरोनाचे संकट अजून टळलेल नाही. त्यामुळे नागरिकांनी घाबरदारी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत माध्यमांशी संवाद साधला. तत्पूर्वी त्यांच्या हस्ते पिंपरी चिंचवड एमआयडीसी मध्ये इलेक्ट्रॉनिक वाहन निर्मिती प्लांटचे उदघाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती दिली. यावेळी पवार म्हणाले की, राज्यात रुग्ण कमी होत असल्यामुळे राज्य सरकारने राज्यात पहिले निर्बंधांमध्ये थोडी शिथिलता दिली आहे. मात्र, लोकांनीही आता काळजी घेणे गरजेचे आहे. सध्या कोरोनाचा धोका अजूनही टळलेला नाही. कोरोनाबरोबर तिसऱ्या लाटेचाही धोका आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाने काळजी घ्यावी.
केंद्र सरकारच्या हातात लस देण्याचे अधिकार आहेत. केंद्राकडून लसी मिळाल्यातरच पुढे लसींचा पुरवठा केला जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्राकडे लसी मागत आहेत. आपण दररोज वीस लाखांपर्यंत लस देत आहोत. मात्र, सध्या लसींचे उत्पादन होणे गरजेचे आहे. लोकांच्या मानसिकतेतही सध्या बदल झाला आहे. तो म्हणजे आपण लस घेतली पाहिजे. हि चांगली गोष्ट आहे, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी सांगितले.