Wednesday, February 1, 2023

एमजीएम कॅम्पसमध्ये तिसर्‍या मजल्यावरून पडुन मजूर ठार

- Advertisement -

औरंगाबाद | एमजीएम कॅम्पसमध्ये इमारत बांधकाम करताना तिसर्‍या मजल्यावरून पडुन एक मजूर ठार झाल्याची घटना गुरुवारी दुपारी 12.30 च्या सुमारास घडली.  आकाश हरिदास राठोड वय 28 वर्ष (रा. धामणगाव) असे मृताचे नाव आहे.

आकाश राठोड हा एमजीएम कॅम्पसमध्ये इमारत बांधकामाच्या ठिकाणी सेंट्रींग मजुर म्हणून काम करत होता. तिसर्‍या मजल्यावर काम असताना अचानक पाय घसरून तो खाली पडला. यात त्याच्या डोक्यावरील हेल्मेटचे तुकडे होऊन त्याचा डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

- Advertisement -

आकाश राठोड याला एमजीएम रूग्णालयात दाखल मात्र गुरूवारी दुपारी दोनच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याबाबतसिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.