Monday, January 30, 2023

धक्कादायक ! खंडणी दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा दाखल करेल; सासूची जावयाला धमकी

- Advertisement -

कोल्हापूर : हॅलो महाराष्ट्र – कोल्हापूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका सासूने आपल्याला जावयालाच धमकी दिली आहे. ‘माहेरी आलेल्या पत्नीला घरी घेऊन जायचे असेल तर दहा लाख रुपयांची खंडणी दे, नाहीतर पत्नीला बलात्काराचा गुन्हा दाखल करायला लावेल’ अशा शब्दांत सासूने आपल्या जावयाला धमकी दिली आहे. या प्रकरणी जावयाने पत्नी आणि सासूसह पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी खंडणीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून प्रकरणाचा पुढील तपास सुरु केला आहे. सासू संगीता गायकवाड, पत्नी आशा बेनाडी,स्वप्निल नाईक,संजय महाडिक,संतोष हातनाळे अशी गुन्हा दाखल झालेल्या पाच आरोपींची नावे आहेत. तर जावई लखन आण्णाप्पा बेनाडे यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

फिर्यादी लखन आण्णाप्पा बेनाडे आणि आरोपी पत्नी आशा बेनाडे यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते. पण घरगुती कारणामुळे पत्नी माहेरी निघून गेली होती. नवऱ्याने पत्नीला वारंवार विनंती करूनदेखील पत्नीने नांदायला येण्यास नकार दिला. यादरम्यान सासू संगीता गायकवाड आणि पत्नी आशा बेनाडे यांनी आरोपी नाईक, महाडिक, हातनाळे यांच्या संगनमताने लखन आण्णाप्पा बेनाडे यांच्याकडे खंडणी मागितली होती. तसेच संबंधित आरोपींनी 29 जून रोजी जयसिंगपूर येथील नटराज हॉटेल समोर फिर्यादीला धमकीदेखील दिली.

- Advertisement -

आरोपींनी पत्नी आशाला सासरी पाठवण्यासाठी तिच्या पतीकडे म्हणजेच लखन आण्णाप्पा बेनाडे याच्याकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागितली होती. तसेच जर खंडणी दिली नाही तर पत्नीला तुझ्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करायला लावेल, अशी धमकीसुद्धा दिली. धमकी दिल्यानंतर पती लखन बेनाडे यांनी पत्नी आणि सासूसह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी खंडणीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पुढील घटनेचा तपास सुरु केला आहे.