Friday, January 27, 2023

एमआयएममुळे शहराचा विकास राखडतो; ते दंगे घडवतात- शिवसेना नेते चंद्रकांत खैरे

- Advertisement -

औरंगाबाद : शिवसेना नेते चंद्रकांत खैरे विरुद्ध खासदार इम्तियाज जलील यांची नेहमीच शाब्दिक टोलेबाजी पाहायला मिळते. आज देखील काहीसे असेच घडले आहे. चंद्रकांत खैरे एका उर्दू दैनिकाच्या वर्धापन दिन सोहळ्याला गेले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला असता पत्रकारांनी त्यांना काही प्रश्न विचारले. त्यावर चंद्रकांत खैरे यांनी एमआयएमवर निशाणा साधत खोचक खोचक प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

यावेळी ते म्हणले, “मी जे केले ते कोणी करू शकत नाही. म्हणून त्यांच्यावर मुस्लिम समाज पण नाराज आहे. एमआयएम सोबत मुस्लिम समाज आता उभा राहणार नाही. हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा शहर आहे. मनपा निवडणुकीत महविकास आघाडी निवडून येईल आणि महापौर शिवसेनेचा होईल. कारण आम्ही सर्वत्रच काम केले. औरंगाबाद शहराचा चांगला विकास होत आहे. मात्र एमआयएममुळे विकास राखडतो. ते दंगे घडवतात”

- Advertisement -

दरम्यान, त्यांनी दावा केला आहे कि मनपा निवडणुकीत महविकासच आघाडी निवडून येईल. आणि येत्या लोकसभेच्या निवडुकीत मुस्लिम आणि हिंदू समाज सोबत येऊन मला निवडून देतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.