Thursday, March 30, 2023

कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे रहावे : नंदकुमार मोरे

- Advertisement -

पुसेसावळी | खटाव तालुका तीन मतदारसंघामध्ये विभागला गेल्यामुळे तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने तालुका एकसंघ राष्ट्रवादीच्या पाठीमागे राहिला पाहिजे. यासाठी गावोगावच्या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे.
त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आम्ही सर्वजण सदैव तत्पर राहू, अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष नंदकुमार मोरे यांनी दिली. चोराडे (ता.खटाव) येथे सातारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जनसंपर्क अभियानांतर्गत कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी माजी. जि. प. सदस्य प्रा. बंडा गोडसे, मार्केट कमिटी माजी सभापती सी. एम. पाटील, सह्याद्री कारखाना संचालक संतोष घार्गे, पुसेसावळीचे माजी सरपंच सुरेश पाटील, मार्केट कमिटीचे माजी उपसभापती अनिल माने, रहाटणीचे माजी सरपंच संभाजी थोरात, म्हासुर्णे सोसायटीचे माजी व्हा. चेअरमन विलास शिंदे, रहाटणीचे ग्रामपंचायत सदस्य सुनिल चन्ने, माजी सरपंच किसन घुटुगडे, बापूराव पिसाळ, दत्तात्रय पिसाळ, माजी ग्रामपंचायत सदस्य श्रीकांत पिसाळ, माजी व्हा.चेअरमन पै. शांताराम पिसाळ, विष्णू पंत पिसाळ, सुनिल पिसाळ, नंदकुमार पिसाळ, सुनिल जानकर, वसंत पिसाळ, प्रकाश पिसाळ, माजी. सोसायटी सदस्य विलास पिसाळ, संभाजी कुंभार, संजय चव्हाण, चंद्रकांत अवघडे, अक्षय घाटगे, बाळासो पिसाळ प्रशांत पिसाळ आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

- Advertisement -

नंदकुमार मोरे पुढे म्हणाले की, सातारा जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला आहे, तो अभेद्य ठेवण्यासाठी गावोगावी भेटुन कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणुन घेऊन पक्ष श्रेष्ठींपर्यंत पोहचवणार आहे. तसेच खटाव तालुक्यातील गावागावात पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम आपणा सर्वाना करायचे आहे. यासाठी गावागावात असणारे गट तट विसरुन एकमेकांतील मतभेद दूर करावेत.