World Aids Day | आज म्हणजेच 1 डिसेंबर होती सर्वत्र जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. एड्स हा गंभीर आजार आहे. आणि या आजाराचे गांभीर्य लोकांना पटवून देण्यासाठी आणि त्या रोगाविरुद्ध लढण्यासाठी लोकांनी काय केले पाहिजे? याबद्दलची माहिती देऊन लोकांमध्ये जागृकता निर्माण केली जाते. यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने या दिनानिमित्त “योग्य मार्ग घ्या माझे आरोग्य माझा हक्क” ही थीम निवडलेली आहे. आज आपण एचआयव्ही आणि एड्स मधील सामान्य फरक जाणून घेणार आहोत. तसेच एड्स झाल्यावर तुमच्या शरीरात कोणती लक्षणे दिसतात? हे देखील जाणून घेणार आहोत.
एचआयव्ही हा एक व्हायरस आहे. जो मानवाच्या रोगप्रतिकारशक्तीवर हल्ला करतो. आणि त्याच वेळी एड्स होतो. एचआयव्हीच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये माणसाला एड्स (World Aids Day) होत असतो. पहिले दोन टप्पे हे एचआयव्हीचे असतात. परंतु शेवटच्या टप्प्यांमध्ये या एचआयव्हीची तीव्रता वाढते. आणि लोकांना एड्स होतो. आता एड्स झाल्यावर कोणती लक्षणे दिसतात ही आपण जाणून घेणार आहोत.
एड्सची सुरुवातीची लक्षणे | World Aids Day
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जेव्हा एखाद्या व्यक्तीला HIV होतो. तेव्हा त्या माणसाला इन्फ्लुएंझा यांसारखी लक्षणे दिसतात. यामध्ये सामान्यता लोकांंना ताप येतो, डोकेदुखी, अतिसार, अंगावर पुरळ येतात. तसेच घसा खवखवतो यांसारखी लक्षणे दिसतात. तसेच तुमची रोग प्रतिकार शक्ती अगदीच कमी होत जाते. तुमचे वजन कमी होण्यास सुरुवात होते. तसेच खोकला येण्याची शक्यता देखील जास्त असते.
जर तुम्हाला वरील लक्षणे दीर्घकाळ दिसत असतील, तर अजिबात त्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता. तुम्ही वेळीच उपचार घ्या. अन्यथा पुढे जाऊन तुम्हाला अत्यंत गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते. या रोगांमध्ये क्षय, मेंदूज्वर, गंभीर जिवाणू, संक्रमण, कपाशी यांसारख्या कर्करोगाचा देखील समावेश असतो. जर तुम्ही वेळीच उपचार घेतले नाही, तर त्याचे संक्रमण तुमच्या शरीरात वाढत जाते. आणि नंतर जाऊन हा आजार तुमच्या जीवाशी देखील बेतू शकतो. त्यामुळे वरील लक्षणे जर दीर्घकाळ शरीरात दिसत असतील, तर तुम्ही वेळीच डॉक्टरांचे उपचार घेणे गरजेचे आहे.