World Cup 2023 : ‘या’ कारणांमुळे भारताला हरवणं भल्याभल्या संघाना जमू शकत नाही

World Cup 2023
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | भारतात सध्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धा (World Cup 2023) सुरु असून क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आत्तापर्यंतचे सर्वच्या सर्व ७ सामन्यात दिमाखदार विजय मिळवत सेमी फायनल मध्ये प्रवेश केला आहे. अजून तरी कोणताही सांग भारताला हरवू शकलेला नाही. भारतीय संघामध्ये नेमकं असं काय आहे ज्यामुळे अजूनही भारत अजिंक्य आहे हेच आज आपण जाणून घेऊया.

रोहित साकारतोय धोनीसारखी रणनीती :

कोणताही सामना जिंकण्यासाठी तुम्ही काय रणनीती आखताय हे महत्वाचे असते. जस आधी धोनी नेतृत्व करायचा तस रोहित शर्मा त्याची भूमिका ही अत्यंत शांत आणि संयमाने पार पाडत आहे. ज्याप्रमाणे धोनी मैदानात खेळत असताना अत्यंत थंड डोक्याने प्लॅ्निंग करायचा अगदी तसच आता रोहित शर्मा वर्ल्डकप मध्ये वागताना दिसून येत आहे. रोहितचे शांत नेतृत्व भारतीय संघाला फलदायी ठरत आहे.

संघाची एकजूट : World Cup 2023

संघामध्ये जर एकजुट असेल तर प्लॅनिंग पूर्णपणे सफल होते. अन्यथा सर्वजण एकत्र असूनही नसल्यात जमा असतात. यावेळी भारतीय टीममध्ये एकमेकांना पूर्णपणे सहकार्य केले जात आहे. रोहित शर्मा प्रत्येक मॅच मध्ये आपल्या टीमला इन्स्ट्रक्शन देताना दिसून येत आहे. त्यामुळे ऐनवेळी काय करावे अशी परिस्थितीती उदभवत नाहीये. प्रत्येकजण आपल्याकडून खेळात पूर्णपणे जीव ओतून खेळ खेळत आहे. जरी ऑलराऊंडर हार्दिक पांड्या अचानक टीममधून गेला असला तरी टीमची स्थिती ही मजबूत राहिली आहे. केएल राहुल, श्रेयस अय्यर, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव यांच्या एकत्रित खेळी मुळे टीम सेमी फायनल मध्ये पोहचली आहे. बुमराह, सिराज आणि शमी यांच्या वेगवान खेळीमुळे तर दुसरीकडे जडेजा आणि कुलदीपच्या स्पिनमुळे भारतीय टीम मैदानात येणाऱ्या टीमला मात देत आहे. म्हणूनही भारतीय संघ यावेळी जिंकू शकतो.

राहुल द्रविडचे मार्गदर्शन :

राहुल द्रविडच्या कोचिंगचा मोठा फायदा भारतीय संघाला होताना दिसत आहे. राहुल हा अत्यंत फोकस्ड क्रिकेटपटू आहे. द्रविडने पूर्ण टीमला वर्ल्डकप सुरु होण्याच्या आधीच खेळाडूंचा फिटनेस, त्यांची खेळी कशी मजबूत ठेवायची यावर अधिक लक्ष दिले आहे. त्यामुळे मैदानात आपलाच झेंडा आतापर्यंत भारताने रोवलेला दिसून आला आहे.  त्यामुळे भारतीय संघ वर्ल्डकप जिंकू शकतो.

संघाची सकारात्मकता भारताला जिंकू शकते:

कोणताही डाव जिंकण्यासाठी संघामध्ये सकारात्मक भूमिका असने अत्यंत गरजेचे असते. ती जर हालली तर पूर्ण खेळीवर पाणी फेरल जाते. त्यामुळे यावेळी भारतीय टीम आणि टीमचा कॅप्टन सकारात्मक भूमिका बजावताना दिसून येत आहे. याच अंदाजात पाकिस्तान, साऊथ आफ्रिका, श्रीलंका आणि इंग्लंड सोबत खेळी केल्यामुळे भारतीय संघ सेमी फायनल मध्ये आहे. तसेच कोहली, गिल, अय्यर, राहुल कॅप्टन रोहित सारखे कुल राहत आपली भूमिका पार पाडत आहेत. तसेच भारत पहिल्या 10 ओव्हर मध्येच मॅचची संपूर्ण सूत्रे हातात घेत आहे.

आपलेच मैदान आणि चाहत्यांचा पाठिंबा

यंदाचा क्रिकेट वर्ल्डकप (World Cup 2023) भारतात होत असल्यामुळे देशातील प्रत्येक मैदानाची परिस्थिती, तेथील वातावरण याचा अंदाज भारतीय खेळाडूंना आहे. त्यातच घरच्या मैदानावर वर्ल्डकप असल्याने क्रिकेट चाहत्यांचा सुद्धा मोठा पाठिंबा भारतीय संघाला मिळत आहे. याचमुळे खेळाडूंचा अंगात जोश आणि उत्साह संचारत असून भारतीय संघाकडून अतिशय दिमाखदार खेळ होत आहे. या एकूण सर्व कारणांनी रोहित सेनेचा पराभव करणं इतर संघाना वाटत तितकं सोप्प नाही हेच खरं.