हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणाऱ्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया विश्वचषक अंतिम सामन्यासाठी सर्वचजन उत्सुक आहेत. 12 वर्षानंतर भारत फायनल मध्ये पोहचल्यामुळे या सामन्याची वाट सर्वजण पाहत आहेत. हा सामना प्रत्यक्ष पाहण्यासाठी अनेकांनी आपले तिकीट आधीच बुक करून ठेवले आहेत. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा महामुकाबला होणार आहे. हा सामना पाहण्यासाठी दूर दूरवरून चाहते येणार असल्यामुळे गाडयांना गर्दी होऊ नये या उद्देशाने मध्य रेल्वेने ज्यादाच्या तीन गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
कोणत्या असतील या गाड्या?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यासाठी मध्य रेल्वेकडून एकूण तीन गाड्या सोडल्या जाणार आहेत. त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अहमदाबाद विशेष एक्सप्रेस, वांद्रे टर्मिनस-अहमदाबाद स्पेशल ट्रेन आणि मुंबई सेंट्रल-अहमदाबाद रेल्वे या तीन गाड्या सोडल्या जाणार आहेत.
कसे असेल वेळापत्रक?
17 डब्यांची असलेली छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-अहमदाबाद विशेष एक्सप्रेस ही रेल्वे 18 नोव्हेंबर रोजी रात्री 10:30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई इथून निघेल तर दुसऱ्या दिवशी सकाळी 6:40 वाजता अहमदाबादला जाऊन पोहचेल. तर सामना संपल्यावर गाडी मध्यरात्री 1:44 वाजता तिथून निघून सकाळी 10:35 ला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. वांद्रे टर्मिनस येथून निघणारी वांद्रे टर्मिनस-अहमदाबाद स्पेशल ट्रेन ही रात्री 11:45 वाजता निघून सकाळी 07:20 वाजता अहमदाबादला पोहोचेल. तर अहमदाबाद-वांद्रे टर्मिनस ही सामना संपल्यानंतर अहमदाबादहून सकाळी 4 वाजता निघेल आणि पुढे वांद्रे टर्मिनस इथं दुपारी 12:10 वाजता पोहोचेल. त्यानंतर तिसरी आणि शेवटची गाडी म्हणजे मुंबई सेंट्रल-अहमदाबाद गाडी रात्री 11:55 वाजता निघून सकाळी 08:45 वाजता अहमदाबादला पोहोचेल. तर वापस येण्यासाठी सकाळी 06:20 वाजता निघून त्याच दिवशी दुपारी 02:10 वाजता मुंबई सेंट्रल इथं पोहोचेल.
कोणत्या ठिकाणाहुन जातील या गाड्या?
या रेल्वेगाड्या ठाणे, दादर, वसई, सुरत, वडोद्रा, बोरीवली, वापी, वलसाड, नवसारी, सुरत, भरूच आणि वडोदरा या ठिकाणी जातील. त्यामुळे येथील क्रिकेटप्रेमीना या गाड्यामुळे हा सामना प्रत्यक्ष बघता येणार आहे.