World Liver Day 2024 | तरुणांमध्ये वाढतोय फॅटी लिव्हरचा त्रास; पहा कारणे आणि उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | World Liver Day 2024 आजकाल यकृताशी संबंधित अनेक आजार वाढायला लागलेले आहेत. तुम्ही जर यावर वेळेवर उपचार केले नाही. तर तुम्हाला अनेक गंभीर परिणामांना सामोरे जावे लागते. त्याचप्रमाणे फॅटी लिव्हर ही समस्या देखील आजकाल खूप तरुणांमध्ये वाढत चाललेली आहे. आजकाल तरुणांची बैठी जीवनशैली, त्याचप्रमाणे त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे तरुण वर्गामध्ये समस्या मोठ्या प्रमाणात वाढायला लागलेली आहे. त्यामुळे आज आपण या बातमीमध्ये फॅटी लिव्हरचे जोखीम घटक टाळण्यासाठी काय उपाय केले पाहिजेत. आणि त्याचा धोका कशाप्रकारे कमी करता येईल याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.

फॅटी लिव्हर म्हणजे काय?

आजकाल भारतामध्ये असे अनेक तरुण आहेत. जे फॅटी लिव्हरमुळे त्रस्त आहेत. फॅटी लिव्हर म्हणजे यकृतामध्ये जास्त चरबी तयार होते. फॅटी लिव्हरचा हा रोग जास्त प्रमाणात मद्यपान केल्यामुळे होत असतो. गेल्या 30 वर्षात डॉक्टरांना असे समजले आहे की, अनेक रुग्ण आहे जे मद्यपान न करून देखील त्यांना फॅटी लिव्हरची समस्या आहे. हा विकार नॉन अल्कोहोलिक फॅटी डीसिज म्हणून ओळखला जातो. यामुळे यकृताचा कर्करोग होतो किंवा यकृत निकामी होते. अशावेळी रुग्णाचा जीव देखील जाऊ शकतो.

फॅटी लिव्हरचे जोखीम घटक कोणते | World Liver Day 2024

आजकाल तरुणाईची जीवनशैली बदलत चाललेली आहे. त्यामुळे लेट नाईट पार्टी, जंक फूड खाणे, व्यसनाच्या आहारी जाणे, त्याशिवाय याशिवाय बैठे काम करणे. त्यामुळे त्यांचे वजन वाढत आहेत. तसेच कोलेस्ट्रॉल यांसारख्या समस्या देखील उदभवतात. त्यामुळे फॅटी लिव्हरसारखे आजार निर्माण होत आहेत. लठ्ठपणा, उच्च कॉलेस्ट्रोल, पीसीओएस टाईप 2 मधुमेह, हायपोथायॉइडझम आणि मेटाबोलिक सिंड्रोमचा देखील समावेश आहे. त्याचप्रमाणे जे लोक जास्त प्रमाणात मद्यपान करतात त्यांच्या यकृतावर ताण येतो आणि फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते.

फॅटी लिव्हरवर प्रतिबंधात्मक उपाय

यासाठी आपल्याला निरोगी आहार घ्यावा लागेल. आपली जीवनशैली देखील साधी ठेवावी लागेल. कारण आजकाल तरुणांमध्ये फॅटी लिव्हरचा धोका मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे.

पोषक आहाराचे सेवन करणे

आहारामध्ये प्रक्रिया केलेले पदार्थ साखरयुक्त पदार्थ, जंक फूडचे प्रमाण जास्त असल्यावर देखील फॅटी लिव्हरचा धोका होतो. त्यामुळे हे खाणे टाळावे या ऐवजी संपूर्ण धान्य, हिरव्या पालेभाज्या, फळे, दही, मास, बीन्स, चिकन, अंडी यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा तसेच भरपूर पाणी देखील पिणे गरजेचे आहे.

वजन नियंत्रणात ठेवणे | World Liver Day 2024

लठ्ठपणा हा फॅटी लिव्हरचा सगळ्यात मोठा जोखीम घटक आहे. त्यामुळे आपले वजन नियंत्रित ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी सकस आहार घेणे आणि नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे.

शारीरिक क्रिया करणे

व्यायाम केल्याने आपल्या शरीरातील चरबी कमी होते. त्याचप्रमाणे चयापचय क्रिया देखील चांगली होते. त्यामुळे एका जागेवर जास्त वेळ बसू नका. लहान ब्रेक घ्या. व्यायाम करता येत नसेल तर किमान अर्धा तास तरी चाला.

कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवणे

कोलेस्ट्रॉलच्या बाजूची नियमित तपासणी करा. नियंत्रित करण्यासाठी तुमच्या आहाराचे वेळापत्रक बनवा आणि त्यानुसार आहार घ्या.

अल्कोहोल पिने टाळणे

अल्कोहोलच्या अति सेवनामुळे देखील यकृत्याच्या संबंधित अनेक गंभीर आजार निर्माण होऊ शकतात. फॅटी लिव्हर किंवा फॅटि कर्करोग देखील या मद्यपानामुळे होऊ शकतो. त्यामुळे अल्कोहोलचे सेवन टाळा त्यासोबत तंबाखू आणि धूम्रपान यांसारख्या गोष्टी देखील खूप घातक आहेत.