Gold Price Today : सोन्याच्या किंमती घसरल्या की वाढल्या? पहा आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही महिन्यापासून सुरु असलेली सोन्याची घोडदौड (Gold Price Today) आजही सुरूच आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर १९ एप्रिल २०२४ रोजी १० ग्राम २४ कॅरेट सोने 73118 रुपयांवर व्यवहार करत आहे. कालच्या तुलनेत या किमतीमध्ये 0.14% म्हणजेच 102 रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात ८८ रुपयांनी किरकोळ घट झाली असून १ किलो चांदीचा दर 83185 रुपये आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.

MCX वर आज सकाळी ९ वाजता १० ग्राम २४ कॅरेट सोने ७३१३० रुपयांवर व्यवहार करत होते. मात्र तासाभरातच या किमतीत लक्षणीय वाढ (Gold Price Today) पाहायला मिळाली. ९ वाजून ३० मिनिटांनी सोन्याचा भाव ७३२६० रुपये झाला आणि त्यानंतर सोन्याची घोडदौड अजूनही सुरूच आहे. आत्ता १२ वाजता १० ग्राम २४ कॅरेट सोने ७३२२५ रुपयांवर व्यवहार करत आहे. आज दिवसअखेर या किमतीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे गुड रिटर्न वेबसाईट नुसार, १० ग्राम २४ कॅरेट सोने ७४४९० रुपये आहे तर चांदी ८६५०० रुपये प्रतिकिलो आहे.

Good Return वेबसाईटनुसार सोन्याचे आजचे भाव- (Gold Price Today)

22 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 68,150 रुपये
मुंबई – 68,150 रुपये
नागपूर – 68,150 रुपये

24 कॅरेट सोन्याचा आजचा भाव (प्र. 10 ग्रॅम)

पुणे- 74,340 रूपये
मुंबई – 74,340 रूपये
नागपूर – 74,340 रूपये

सोन्याची शुद्धता कशी तपासाल?

साधारणतः नागरिक सोन्याचे दागिने बनवण्यासाठी 22 कॅरेट सोन्याचा वापर करतात. मात्र आपल्याला हे माहिती असायला हवे कि, 22 कॅरेट सोन्यामध्ये 91.66 टक्के सोने असते. तसेच त्यात 2 कॅरेट इतर धातू वापरलेले असतात. हॉलमार्क केलेले सोने घेण्यासच नागरिक जास्त पसंती देतात. कारण हे सोने खात्रीशीर असते. दागिन्यांमध्ये शुद्धतेशी संबंधित 5 प्रकारचे हॉलमार्क आहेत आणि हे हॉलमार्क दागिन्यांवरती असतात.