हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – आतापर्यंत आपण रस्त्यावर चालणाऱ्या बाईक बघितल्या असतील. मात्र आता तंत्रज्ञान एवढे पुढे गेले आहे कि आता तुम्हाला हवेत उडणारी बाइकदेखील (Worlds First Flying Bike) पाहायला मिळणार आहे. आश्चर्य वाटलं ना… पण हे खरं आहे. आकाशात उडणाऱ्या बाईकची बुकिंग सुरू झाली आहे. अमेरिकन एव्हिएशन कंपनी जेटपॅकने जगातील पहिल्या फ्लाइंग बाईकची (Worlds First Flying Bike) बुकिंग घेणे सुरू केले आहे. या बाईकमध्ये 8 पॉवरफुल जेट इंजिन बसवण्यात आले आहे. त्यामुळे आता लोकांची ट्रॅफिकची चिंता मिटली. या बाईकमध्ये 30 मिनिटांत 96 किमीचा प्रवास करण्याची क्षमता असल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. चला तर या बाइक विषयी अधिक जाणून घेऊया….
या बाईकचे डिझाईन कशा प्रकारचे आहे?
या बाइकमध्ये आठ जेट इंजिन वापरण्यात आले आहेत. हे जेट इंजिन बाईकच्या चारही कोपऱ्यांवर वापरले जातील. जे रायडरला संरक्षण देण्यास मदत करेल. ही बाईक 136 किलोपर्यंतच्या बाईक रायडरसह 250 किलोपर्यंत वजन उचलण्यास सक्षम असेल.
वेग किती असणार?
हवेतून उडणारी ही बाईक (Worlds First Flying Bike) 250mph वेगाने हवेत उडण्यास सक्षम असणार आहे. या बाईकला व्हिडीओ गेमसारखा कंट्रोल सिस्टीम असणार आहे. ही बाईक हवेत उडण्यासाठी लढाऊ विमानांमध्ये फ्लाय-बाय-वायर तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. हे हँडग्रिपमध्ये असलेल्या बटणांद्वारे नियंत्रित करण्यात येणार आहे. ज्यामध्ये एक बटण टेक ऑफ आणि लँड करायचे आहे. तर दुसरे बटण उंचीवर नेऊन स्पीड वाढवण्याचे आहे.
किंमत किती असणार?
या बाईकचे (Worlds First Flying Bike) निर्माते जेटपॅक एव्हिएशनने या बाईकसाठी बुकिंग घेणे सुरू केले आहे. या बाईकची किंमत 3.15 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे. हि बाईक येत्या दोन-तीन वर्षांत बाजारात दाखल होऊ शकते.
हे पण वाचा :
बिहारमध्ये आणखी मोठी राजकीय उलथापालथ होणार; प्रशांत किशोर यांचं भाकीत
Airtel च्या ‘या’ प्लॅनमध्ये फ्री मध्ये मिळवा Amazon Prime चे सब्सक्रिप्शन !!!
‘धर्मवीर’ चित्रपटाबाबत केदार दिघेंचं मोठं विधान; म्हणाले कि…
Atal Pension Yojana द्वारे रिटायरमेंटनंतर मिळवा खात्रीशीर पेन्शन !!!
दहीहंडीचा समावेश आता क्रीडा प्रकारात होणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा ऐतिहासिक निर्णय