World Social Media Day 2024 | आजचा काळ हा सोशल मीडियाचा काळ आहे. सोशल मीडिया आपल्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे. आपल्याला जगभरातील सगळ्या घडामोडी घरात बसल्यात एका क्लिकवर सोशल मीडियाला पाहायला मिळतात. त्यामुळे सोशल मीडियाने सगळ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले आहे. तंत्रज्ञानाने केलेल्या या विकासामुळे आता घरबसल्या माणसांना जगभरातील गोष्टी समजतात. अगदी मनोरंजनासाठी महत्त्वाच्या गोष्टींसाठी सोशल मीडिया मोठ्या प्रमाणात वापरले जाते. महत्त्वाच्या गोष्टींची माहिती मोठ्या बातम्या वाचण्यापेक्षा सोशल मीडियावर एका क्लिकने समजते. त्यामुळे अनेक लोक सोशल मीडिया जास्त प्रमाणात वापरतात.
सोशल मीडिया (World Social Media Day 2024) हा केवळ माहितीचा स्त्रोत न राहता, आता कमाईचा एक मोठा स्त्रोत झालेला आहे. अनेक लोक आता घर बसून सोशल मीडियाच्या माध्यमातून पैसे कमावत आहे. कोरोनाच्या काळात व्हिडिओ बनवण्याची कला अनेक लोकांमध्ये आलेली आहे. त्यामुळे अनेक लोक त्यांच्या व्हिडिओद्वारे त्यांचे टॅलेंट दाखवतात. आणि हे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करून लाखो रुपये कमवतात. तुम्ही देखील instagram facebook youtube वर व्हिडिओ शेअर करून लाख रुपये कमवू शकता. त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल.
तुम्ही अशी कमाई करू शकता
स्टेप 1 | World Social Media Day 2024
तुम्हाला सोशल मीडियावर तुमचे अकाउंट तयार करावे लागेल. आणि त्यावर तुम्हाला जो आवडतो तो कंटेंट टाकावा लागेल. म्हणजे जर तुम्हाला चांगले जेवण बनवता येत असेल तर तुम्ही जेवणाचे व्हिडिओ टाकू शकता. त्याचप्रमाणे डान्स येत असेल किंवा तुम्हाला नवीन कंटेंट क्रिएट करता येत असेल, तर तुम्ही त्याचे व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर पोस्ट करू शकता.
तुम्ही जेव्हा व्हिडिओ पोस्ट करतात. तेव्हा ते व्हिडिओ अनेक लोकांपर्यंत पोहोचतात. आणि तुमचे फॉलोवर्स वाढतात हे फॉलोवर जमा होण्यासाठी थोडा वेळ लागतो. परंतु एकदा का तुमचे व्हिडिओ लोकांना आवडायला लागले की तुमचे व्हिडिओ क्षणार्धात वायरल होतात.
स्टेप 2
तुम्ही जर सोशल मीडियाचे सगळे नियम व अटी पूर्ण केल्या त्यानंतर तुमच्या व्हिडिओवर सोशल मीडिया करून जाहिराती दाखवल्या जातात. आणि त्यातून तुम्हाला पैसे मिळतात यातून देखील तुमची कमाई सुरू होते
स्टेप 3
सोशल मीडिया जाहिरातीशिवाय अनेक मोठ्या कंपन्या देखील जाहिरातीसाठी तुमच्याशी संपर्क साधतात. त्यातूनही तुम्ही चांगली कमाई करू शकता. परंतु त्यासाठी तुम्हाला कष्ट घेणे गरजेचे आहे आणि चांगला कंटेंट पोस्ट करणे देखील गरजेचे आहे.