हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काही व्यक्तींना निरनिराळ्या प्रकारच्या फोबियामुळे भीती वाटत असते. कोणाला उंचीची भीती वाटते, कोणाला आगीची भीती वाटते तर कोणाला आणखी कोणत्या गोष्टीची. फोबियामुळे व्यक्ती या गोष्टींपासून दूरच राहण्याचा प्रयत्न करतात. आज आपण अशाचं एका व्यक्तीबाबात माहिती घेणार आहोत ज्या व्यक्तीनं गेल्या ६७ वर्षांपासून आंघोळचं केली नाही.
ओमी हाजी असं या व्यक्तीचं नाव असून ते आता ८७ वर्षांचे आहेत. ओमी हाजी हे ईराणमध्ये राहतात. जगातील सर्वात घाणेरडी व्यक्ती असं संबोधलं जातं. परंतु ते याकडेदेखील दुर्लक्ष करतात. काही स्थानिक माध्यमांनी ओमी हाजी याना काही प्रश्न त्यांच्या आंघोळ न कारण्याबद्दल विचारले असता त्यांच्या फोबियाविषयी माहिती समोर आली. आपल्याला पाण्याची भीती वाटते. त्यामुळे आंघोळ करणं तर दूर आपण पाण्याच्या जवळपासही भटकत नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यामुळं गेल्या ६७ वर्षांपासून ओमी हाजी यांनी आंघोळ न करताच आपलं आयुष्य जगलं आहे.
जर आपण आंघोळ केली तर आपण आजारी पडू अशी भीती त्यांना वाटते. इतकंच काय तर त्यांचं खाणंही सामान्य व्यक्तींच्या अगदी विरोधातलं आहे. ते खाण्यात केवळ जनावरांचं सडकं मांसच खातात. ते अनेकदा पॉर्कुपाइनचं मांस खातात. तर कधीकधी एकाच वेळ ५ सिगारेटही ओढतात. ओमी हे अनेकदा त्यांच्याकडे असलेल्या जुन्या पाईपद्वारे जनावरांच्या अंगावरचा मळ जाळून सिगारेटसारखं ओढतात. हाजी हे दिवसातून ५ लीटर पाणी पितात. थंडीच्या दिवसांमध्ये ते आपल्या डोक्यावर हेलमेट परिधान करून आपलं शरीर गरम ठेवण्याचा प्रयत्न करतात. तर अनेकादा ते त्यांचे केस वाढल्यानंतर जाळून छोटे करत असतात. त्यांच्या आयुष्यात अशा काही गोष्टी घडल्या त्यामुळे ते असे वागू लागले आहेत.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’