Worlds First Heartless Human | हृद्याशिवायही राहू शकता जिवंत, ‘हा’ आहे जगातील पहिला हार्टलेस व्यक्ती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Worlds First Heartless Human | आपले शरीर ही आपल्यासाठी एक मोठी देणगी आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव, प्रत्येक भाग खूप महत्त्वाचा आहे परंतु असे काही शरीरात अवयव आहेत ज्याच्याशिवाय माणूस अगदी काही दिवस काय अगदी काही तासही जगू शकत नाही त्यातीलच एक महत्त्वाचा अवयव म्हणजे आपले हृदय हृदयाशिवाय कोणीही जगू शकत नाही जोपर्यंत आपल्या हृदयाचे ठोके चालू असतात, तोपर्यंत माणूस जिवंत असतो. परंतु आज आपण अशा एका व्यक्त बद्दल जाणून घेणार आहोत. जी हृदयाशिवाय एक महिन्यांपेक्षा जास्त काळ जिवंत राहिली. म्हणूनच त्या व्यक्तीला जगातील पहिली हार्टलेस व्यक्ती (Worlds First Heartless Human ) असे म्हटले जाते.

हाती आलेल्या माहितीनुसार 2011 मध्ये टेक्सास हार्ट इन्स्टिट्यूटच्या दोन डॉक्टरांनी एक उपकरण तयार केले होते. या उपकरणाने मेडिकल जगात अगदी खळबळ उडवून टाकली होती. हृदयाचा ठोका नसतानाही हे उपकरण माणसाला जिवंत ठेवू शकतो. तयार केलेले हे उपकरण या दोन डॉक्टरांनी पहिल्यांदा एका आठ महिन्याच्या बछड्यावर वापरले होते. त्यांनी त्या बछड्याचे हृदय काढून टाकले आणि त्या हृदयाच्या जागी शरीरात हे स्वयंनिर्मित यंत्र बसवले. हे यंत्र वासराच्या संपूर्ण शरीरात रक्ताभिसरण करण्याचे काम करत होते. डॉक्टरांनी हा प्रयोग तब्बल 38 बछड्यांवर केला आणि त्यांचा तो प्रयोग यशस्वी देखील झाला.

या व्यक्तीवर करण्यात आला पहिला प्रयोग | Worlds First Heartless Human

या यशस्वी प्रयोगानंतर हे उपकरण त्या डॉक्टरांनी मानवावर वापरण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी क्रेग लुईस या व्यक्तीची निवड करण्यात आली. माध्यमातील वृत्तानुसार क्रेक हा 55 वर्षाचा होता. आणि तो अमाईलो इडोसिस नावाच्या आजाराने ग्रस्त होता. हा एक दुर्मिळ रोग होता. ज्यामुळे शरीरात असामान्य प्रथिने तयार होतात आणि जलद गतीने हृदय, मूत्रपिंड आणि यकृत यांसारखे अवयव निकामी होऊन जातात. हा रोग त्याला एवढ्या मोठ्या प्रमाणात झाला होता की, तो 12 तासांपेक्षा जास्त दिवस जगू शकणार नाही असे डॉक्टरांनी सांगितले होते. यावेळी मार्च 2011 मध्ये क्रेगची पत्नी लिंडा हिने डॉक्टर बिली कोहन आणि डॉक्टर बस फ्रेझीयर यांच्याशी संपर्क साधला.

एक महिन्यांपेक्षा जास्त काळ जिवंत

लिंडाने केलेल्या विनंतीनुसार डॉक्टरांनी तिच्या पतीचे खराब झालेले हृदय काढून (Worlds First Heartless Human )टाकले. आणि त्या जागी त्यांनी तयार केलेले हे कृत्रिम उपक्रम वापरले. हे उपकरण लावल्यानंतर क्रेगहळूहळू बरा होऊ लागला. परंतु त्याचे यकृत आणि मूत्रपिंड खराब झाल्यानंतर त्याची प्रकृती खूप खालवली आणि त्याच वर्षी एप्रिलमध्ये त्याचा मृत्यू झाला. परंतु हृदयाशिवाय जवळपास एक महिन्यांपेक्षा जास्त काळतो जिवंत होता म्हणूनच त्याला जगातील पहिला हार्टलेस व्यक्ती (Worlds First Heartless Human ) असे म्हटले जाते.