सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात मंगळवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 155 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 2 हजार 147 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 21 हजार 233 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 55 हजार 661 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 30 हजार 920 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3489 बाधितांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी दिवसभरात 33 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
जिल्हाधिकारी यांची कराडला बैठक
सातारा जिल्हाधिकारी शेखरसिंह यांनी शहरात व ग्रामीण भागात विलगीकरण कक्ष सुरु करण्याचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. विविध सामाजिक संस्था यांनी पुढाकार घेतल्यास शासकीय सहकार्य देऊ असेही ते म्हणाले. कराड येथील नवीन प्रशासकीय इमारत याठिकाणी व्हीसीद्वारे आयोजित बैठकीत हे आदेश देण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसिलदार अमरदीप वाकडे, गटविकास अधिकारी डाॅ. आबासाहेब पवार उपस्थित होते