Tuesday, February 7, 2023

चिंताजनक ! औरंगाबाद जिल्हयात 93 नवीन रूग्ण; 671 रुग्णांवर उपचार सुरू

- Advertisement -

औरंगाबाद |गेल्या 24 तासात जुलै महिन्याच्या पहिल्याच दिवशी गुरुवारी शहरात सतरा रुग्ण तर ग्रामीण भागात 76 अशा 93 रुग्णांची भर पडल्याने चिंता अजूनच वाढली आहे. मागील तीन दिवसापासून नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली असल्याने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकेत तर नाहीत ना असा प्रश्न निर्माण झाला आहे.

जिल्ह्यात सध्या 671 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरात करुणा रुग्णांचा आले घसरला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरातील रुग्णसंख्या 20 पेक्षा कमी राहत आहे. याउलट ग्रामीण भागात दररोज 50 पेक्षा अधिक रुग्णांचे निदान होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागाच्या स्थितीविषयी चिंता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

घाटी रुग्णालयात खुलताबाद तालुक्यातील एक गाव येथील 70 वर्षे महिला, वेरूळ येथील 80 वर्षीय महिला, औरंगाबादमधील नारेगाव येथील 71 वर्षे महिला रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींचा आकडा 3429 वर गेला आहे.