औरंगाबाद | कोरोनाचा संसर्ग झपाट्याने कमी होत आहे ही दिलासादायक बाब असली तरी म्युकरमायकोसीस आजाराने डोके वर काढले आहे. दररोज आठ ते दहा नवीन रुग्णांची भर पडत आहे. दिवसभरात दोन ते तीन रुग्णांचा मृत्यू होत आहे. मंगळवारी आणखी दोन जणांचा मृत्यू झाला.
गेल्या काही दिवसात या आजाराने मृत्यू झालेल्या रुग्णांचा आकडा 100 वर गेला आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. म्युकरमायकोसीसने या आजाराचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोना बाधित व इतरांना हा आजार होत असून शहर जिल्ह्यासह मराठवाड्यातील इतर ठिकाणाहून नाही रुग्ण उपचारासाठी येत आहेत.
त्यामुळे रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. या आजाराने आतापर्यंत शंभर जणांचा बळी घेतला आहे त्यामुळे चिंता अजूनच वाढली आहे. औरंगाबाद जिल्ह्यात या आजारामुळे मृत्यूचे प्रमाण जास्त आहे.