चिंताजनक! गेल्या चार दिवसात कोरोनाचे रूग्ण वाढले; 18 रुग्ण व्हेंटिलेटरवर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद |  शहरात गेल्या 4 दिवसात कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. 26 ऑगस्ट रोजी रुग्ण संख्या ही केवळ 26 होती मात्र गेल्या चार दिवसात त्यामध्ये 14 रुग्णांची भर पडली आहे. आणि आता एकूण रुग्ण संख्या 40 वर जाऊन पोहोचली आहे.

घाटी रुग्णालयात दाखल असलेल्या कोरोना रुग्णांपैकी 45 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. घाटी रुग्णालयात सध्या 40 रुग्ण दाखल आहेत. यात 18 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहे. अशी माहिती अधिष्ठाता डॉक्टर कानन येळीकर यांनी सांगितले आहे.

घाटी रुग्णालयातील सुपर स्पेशलिटी ब्लॉकच्या इमारतीतील वार्ड क्रमांक 34 या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. या ठिकाणी 60 खाटांची व्यवस्था आहे. 20 खाटा आईसीयुचे आहेत. बाकीचे 40 साधे आईसीयुच्या एका खाटेसाठी एक चतुर्थ श्रेणी कर्मचारी लागतात, अशी माहितीही डॉक्टर येळीकर यांनी दिली.

Leave a Comment