WPL 2024 : भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. आजपासून वूमन्स प्रीमिअर लीगला सुरुवात होणार आहे. दरवर्षी प्रमाणे यंदाही महिला आयपीएल मध्ये एकूण ५ संघ आहेत. या ५ संघामध्ये एकूण २२ सामने पाहायला मिळतील. आजचा पहिला सामना गतविजेता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कपिटल मध्ये रंगणार आहे. दोन्ही संघामध्ये दिग्गज खेळाडूंचा भरणा असल्याने क्रिकेट चाहत्यांसाठी आजचा सामना म्हणजॆ मोठी मेजवानी असणार आहे.
कुठे होतील सामने – WPL 2024
महिला आयपीएल स्पर्धेचे सर्व 21 सामने दिल्ली आणि बंगळुरू येथे खेळले जातील, ज्यामध्ये अरुण जेटली स्टेडियम आणि एम चिन्नास्वामी स्टेडियमचा समावेश आहे. दोन्ही स्टेडियमवर प्रत्येकी 11 सामने खेळवण्यात येतील. गेल्या वेळी ही स्पर्धा मुंबईतील दोन मैदानांवर आयोजित करण्यात आली होती.
किती वाजता सुरु होणार सामने –
यंदाचे महिला प्रीमियर लीगचे (WPL 2024) सर्व सामने सायंकाळी साडेसात वाजता सुरू होतील. महत्वाची गोष्ट म्हणजे गतवर्षी प्रमाणे यंदाही एकही डबल हेडर सामना नाही. म्हणजेच रोज फक्त एकच सामना खेळवण्यात येईल.
कुठे पाहाल Live –
महिला प्रीमियर लीगचे थेट प्रक्षेपण तूम्ही स्पोर्ट्स 18 नेटवर्क चॅनेल स्पोर्ट्स 18 1 SD आणि स्पोर्ट्स 18 1 HD वर पाहू शकता. याशिवाय जिओ सिनेमा ॲपवर फ्री मध्ये सामन्याचे लाईव्ह-स्ट्रीमिंग पाहता येईल.
मुंबई इंडियन्सचा संघ –
हरमनप्रीत कौर, एलिसा मैथ्यूज, अमनदीप कौर, नताली स्किवर ब्रंट, अमेलिया केर, क्लोय ट्रायन, हुमैरा काजी, इसाबेल वॉन्ग, जिंतिमनी कलिता, कृथना बालाकृष्णन, नताली सीवर ब्रंट, पूजा वस्त्राकर, सजीवन सजना, प्रियंका बाला (विकेटकीपर), यास्तिका भाटिया, फातिमा जाफर, साइका इशाक, शबनिम इस्माइल
दिल्ली कैपिटल्सचा संघ –
मेग लेनिंग (कप्तान), जेमिमा रोड्रिग्स, शेफाली वर्मा, एलिस कैप्सी, मरिजान कॅप , एनाबेल सुदरलँड, लाउरा हैरिस, स्नेहा दीप्ति, अरुंधति रेड्डी, अश्विनी कुमारी, जेस जोनासेन, , मिन्नू मणि, राधा यादव, शिखा पांडेय, अपर्णा मंडल (विकेटकीपर), तानिया भाटिया (विकेटकीपर), पूनम यादव, तितास साधू