पैलवान सिद्धेश साळुंखे ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत राज्यात दुसरा

Wrestler Siddhesh Salunkhe News
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने पुणे येथे नुकत्याच राज्यस्तरीय ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथील सरदार बाबासाहेब माने महाविद्यालयाचा खेळाडू पैलवान सिद्धेश संदीप साळुंखे याने 130 किलो वजन गटात राज्यात द्वितीय क्रमांक पटकवला.

सिद्धेश साळुंखे हा सरदार बाबासाहेब माने महाविद्यालयाचा विद्यार्थी असून त्याने कुस्तीत सराव करून अनेक स्पर्धांमध्ये यश मिळवले आहे. दरम्यान, ग्रीको रोमन कुस्ती स्पर्धेत यश मिळवल्यानंतर सिद्धेश याच्या यशाची महाविद्यालयाकडूनही दखल घेण्यात आली आहे.

पैलवान सिद्धेश याचे यशाबद्दल पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सौ. चित्रलेखा माने – कदम , सचिव डॉ. एच. एस. कदम, सदस्य हर्षवर्धन कदम, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सौ. भाग्यश्री जाधव, शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शिवराज गायकवाड, सर्व प्राध्यापक व प्रशासकीय कर्मचारी यांनी अभिनंदन केले.