व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

लेखक शिरीष कणेकर यांचे निधन; ‘सूरपारंब्या’, ‘माझी फिल्लमबाजी’ चा चेहरा काळाच्या पडद्याआड

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । ज्येष्ठ पत्रकार, सुप्रसिद्ध लेखक शिरीष कणेकर (Shirish Kanekar) यांचे वयाच्या ८० व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मंगळवारी सकाळी प्रकृती खालवल्यामुळे गिरीश कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यानच त्यांच्या मृत्यूची वार्ता हिंदुजा डॉक्टरांनी कणेकर कुटुंबीयांना कळविली. शिरीष कणेकर हे एक निर्भीड पत्रकार असून ते सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण या विषयांवर लिखाण करायचे. शिरीष कणेकर यांची माझी फिल्लमबाजी, कणेकरी ही पुस्तके सर्वात लोकप्रिय आहेत. आपल्या खास शैलीतून आणि टोकदार लिखाणातून गिरीश कणेकर यांनी आपली एक वेगळी छाप निर्माण केली होती. आज तेच गिरीश कणेकर काळाच्या पडद्याआड गेले आहेत.

गिरीश कणेकर यांनी आपल्या कार्यकाळात इंडियन एक्प्रेस, डेली, फ्री प्रेस जर्नल, सिंडिकेटेड प्रेस न्यूज अशा एजन्सी साठी काम केले आहे. तसेच मराठीमध्ये लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, लोकमत, सामना, पुढारी, अशा अनेक वृत्तपत्रांसाठी त्यांनी लिखाण केले आहे. त्याचबरोबर, साप्ताहिक लोकप्रभा, साप्ताहिक प्रभंजन, पाक्षिक प्रभंजन, पाक्षिक चंदेरी, साप्ताहिक चित्रानंद यामध्ये देखील त्यांनी स्तंभलेखन केले आहे.

शिरीष कणेकर यांचे मूळ गाव रायगड जिल्ह्यातील पेण होते. त्यांचे वडील हे एक रेल्वेमध्ये डॉक्टर होते. गिरीश कणेकर यांनी पत्रकार क्षेत्रात प्रवेश केल्यानंतर एक प्रसिद्ध लेखक आणि कथाकथनकार म्हणून आपली ओळख निर्माण केली. शिरीष कणेकर यांना आपल्या कामगिरीमुळे पत्रकार आणि लेखन क्षेत्रातील अनेक पुरस्कार देखील प्रदान करण्यात आले आहेत.

आपल्या खास शैली मधून टोकदार लेखन करणाऱ्या शिरीष कणेकर यांना ‘कै. विद्याधर गोखले ललित साहित्य पुरस्कार’ मुंबई पत्रकार संघातर्फे देण्यात आला होता. तसेच सर्वोत्कृष्ट वाङ्‌मयाचा पुरस्कार त्यांना ‘सूरपारंब्या’ या लेखसंग्रहासाठी प्रदान करण्यात आला होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेकडून त्यांना उत्कृष्ट विनोदी वाङ्‌मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार देखील देण्यात आला होता. अशा अनेक पुरस्कारांचे शिरीष कणेकर मानकरी ठरले होते. आज त्यांच्या जाण्याने साहित्य क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे.