WWE हॉल ऑफ फेमर स्कॉट हॉल यांचे निधन

scott hall
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – डब्ल्यूडब्ल्यूईच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. डब्ल्यूडब्ल्यूई हॉल ऑफ फेमर स्कॉट हॉल यांचे वयाच्या 63 व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. स्कॉट हॉल यांना तीन हृदयविकाराचे झटके आले, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. डब्ल्यूडब्ल्यूई मधील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सच्या यादीत स्कॉट हॉल यांच्या नावाचा समावेश होतो.

स्कॉट हॉल यांची कारकीर्द
स्कॉट हॉल यांचा जन्म 20 ऑक्टोबर 1958 रोजी अमेरिकेत झाला. त्यांनी 1984 मध्ये आपल्या कुस्ती कारकिर्दीला सुरुवात केली, त्यानंतर 1991 मध्ये त्यांनी वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसलिंगमध्ये सहभाग नोंदवला. त्यानंतर त्यांनी यशाची शिखरे गाठली. 1992 मध्ये, स्कॉट हॉल यांना डब्ल्यूडब्ल्यूईने साइन केले, त्यानंतर त्यांना रिंगमध्ये रेझर रेमन म्हणून ओळखले जाऊ लागले.

स्कॉट हॉल यांनी डब्ल्यूडब्ल्यूईमध्ये चार वेळा इंटरकॉन्टिनेंटल चॅम्पियनचे विजेतेपद पटकावले. तसेच त्यांनी नवीन पिढीसाठी एक प्रेरणा म्हणून काम केले. त्यांनी 1995 मध्ये समरस्लॅम आणि रेसलमेनिया येथे स्कॉट हॉलच्या केविन नॅश, ब्रेट हार्ट, शॉन मायकेल्ससह अनेक मोठ्या स्टार्सशी स्पर्धा झाली होती. 1996 मध्ये, स्कॉट हॉल पुन्हा वर्ल्ड चॅम्पियनशिप रेसलिंगमध्ये सामील झाले आणि निवृत्तीपर्यंत तिथेच राहिले. यानंतर स्कॉट हॉल यांनी निवृत्त झाल्यानंतर त्यांचा डब्ल्यूडब्ल्यूई हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला. स्कॉट हॉल यांच्या निधनानंतर अनेक डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार्सनी शोक व्यक्त केला आहे.