गेल्या काही दिवसांपासून प्रतीक्षेत असलेला Xiaomi 14 मोबाईल अखेर भारतात लाँच करण्यात आला आहे. यापूर्वी हा स्मार्टफोन चीनच्या मार्केट मध्ये लाँच करण्यात आला होता. अनेक दमदार फीचर्स, आकर्षक कॅमेरा, प्रोसेसरने सुसज्ज असलेल्या या मोबाईलची किमत वाचून मात्र तुमची झोप उडेल. कारण कंपनीने तब्बल 69,999 रुपयांच्या किमतीत हा स्मार्टफोन बाजारात आणला आहे. आज आपण या रॉयल मोबाईलचे खास फीचर्स जाणून घेऊयात….
Xiaomi 14 मध्ये कंपनीने 120Hz रिफ्रेश रेटसह 6.36 इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले दिला आहे. या डिस्प्लेला यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास व्हिक्टसचे प्रोटेक्शन देण्यात आले आहे. याशिवाय हा डिस्प्ले HDR 10, HDR 10+ आणि डॉल्बी व्हिजनला देखील सपोर्ट करतो. या स्मार्टफोन मध्ये Snapdragon 8 Gen 3 प्रोसेसर देण्यात आला आहे.
कॅमेरा – Xiaomi 14
मोबाईलच्या कॅमेरा बाबत सांगायचं झाल्यास, Xiaomi 14 मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप बसवण्यात आहे. यामध्ये 50-मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 50-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आणि 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे. तर समोरील बाजूला सेल्फी आणि विडिओ कॉल साठी 32 मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. Xiaomi 14 मध्ये 4610 mAh ची पॉवरफुल बॅटरी असून ही 90W हायपरचार्जने फास्ट चार्जिंग होऊ शकते.
किंमत वाचून उडेल झोप –
Xiaomi 14 सध्या 12GB RAM आणि 512GB स्टोरेज या एकाच व्हेरिएन्ट मध्ये लाँच करण्यात आला आहे. परंतु त्याची किंमत 69,999 रुपये आहे. येत्या ११ मार्च पासून Amazon India आणि Xiaomi वेबसाइटवरून तुम्ही हा मोबाईल खरेदी करू शकता. तुम्हाला तुमचे पैसे वाचवायचे असतील तर तुम्ही क्रेडिट कार्डचा वापर करू शकता. ICICI क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास तुम्हाला 5,000 रुपयांची सूट मिळू शकते.