Y Chromosome In Male | एखादी महिला गरोदर असल्यावर आपल्या भारतामध्ये तिला मुलगी होणार की मुलगा होणार? याबाबत अनेक अंदाज लावले जातात. अनेक वेळा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवून मुलगी होणार की मुलगा होणार हे सांगितले जाते. परंतु वैज्ञानिक दृष्ट्या पाहिले तर त्या स्त्रीला मुलगा होणार की मुलगी होणार हे त्या पालकांवर अवलंबून असते. स्त्रियांमध्ये XX ही गुणसूत्र असतात. तर पुरुषांमध्ये XY ही गुणसूत्र असतात. जेव्हा पुरुषांकडून X गुणसूत्र येते. तेव्हा स्त्रीचे X आणि पुरुषाचे X असे XX मिळून मुलीचा जन्म होतो. आणि जेव्हा पुरुषाकडून Y हे गुणसूत्र येते तेव्हा X आणि Y हे मिळून च2 मुलाचा जन्म होतो. म्हणजे तुम्हाला मुलगा पाहिजे असेल तर त्यासाठी पुरुषाकडून Y गुणसूत्र येणे खूप गरजेचे असते. परंतु एका अभ्यासात असे आढळून आलेले आहे की, भविष्यात हे Y गुणसूत्र नष्ट होण्याची भीती आहे. आणि शास्त्रज्ञांनी याबद्दल चिंता देखील व्यक्त केली आहे. जर भविष्यात जाऊन Y हे गुणसूत्र नष्ट झाले. तर मुलांचा जन्म होणार नाही. फक्त मुलींचा जन्म होईल. असा धोका एका संशोधनात व्यक्त करण्यात आलेला आहे.
Y गुणसूत्रांची घसरण | Y Chromosome In Male
संशोधनात असे म्हटलेले आहे की मानवी Y क्रोमोसम हळूहळू आता कमी होत चाललेले आहे. आणि भविष्यात जाऊन ते पूर्णपणे नाहीसे होण्याची देखील शक्यता वर्तवलेली आहे. परंतु हे पूर्णपणे संपायला लाखो वर्ष लागतील. माणूस अजूनही Y गुणसूत्राला पर्यायी असा जनुक विकसित केलेला नाही. जर या Y क्रोमोझोमची घसरण झाली. तर पुढे जाऊन पृथ्वीवरील पुरुषांची जात नाहीशी होऊ शकते. परंतु एका शोधनिबंधामध्ये नवीन जनुक विकसित करण्याची देखील अशा निर्माण केलेली जाते. हे एक पर्यायी क्रोमोसम असणार आहे. परंतु हे विकसित करणे इतके सोपे नाही. त्यासाठी अनेक धोके देखील घ्यावे लागणार आहे.
Y गुणसूत्र मानवी लिंग ठरवते
पुरुषांमध्ये XY ही गुणसूत्र असतात. C गुणसूत्रामध्ये 900 जीन्स असतात. Y गुणसूत्रांमध्ये 55 जीन्स असतात. यामध्ये भरपूर नॉन कॉलिंग डीएनए देखील असतात. Y क्रोमोझोम हे एक असे जनुक आहे. जो महिलांच्या गर्भामध्ये पुरुषाचा विकास करण्यास सुरुवात करते. हे गर्भामध्ये पुरुष संप्रेरक तयार करते आणि त्या बाळाचा एक मुलगा म्हणून विकास होण्यास सुरुवात होते.
परंतु आता वाय आणि एक्स गुणसूत्रामधील विषमता वाढत असल्याचे समोर आलेली आहे. गेल्या 166 दशलक्ष वर्षांमध्ये Y गुणसूत्राने 900 – 55 सक्रिय जीन्स गमावलेले आहे. यामध्ये दर दशलक्ष वर्षांमध्ये पाच जणूकांचे नुकसान होते. आता शेवटचे 55 शिल्लक आहेत आणि हे 55 संपण्यासाठी 11 दशलक्ष वर्ष लागतील. त्यामुळे Y क्रोमोझमबाबत आता शास्त्रज्ञ देखील चिंतेत आहेत.