‘या’ 5 शेअर्सने एका वर्षात मिळवून दिला मोठा फायदा; तुमच्याकडेही आहेत का पहा

Money
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भरपूर पैसे कमावण्यासाठी शेअर बाजार एक चांगले माध्यम आहे. आजकाल अनेक लोकं शेअर बाजारात गुंतवणूक करत आहेत. यामधील गुंतवणुकीचा कलही दिवसेंदिवस वाढतोच आहे. मात्र शेअर बाजारात सतत चढ-उतार होत असतात. यामध्ये काही शेअर्स सतत वर जातात. असे शेअर्स आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून देतात. आज आम्ही तुम्हांला अशा पाच स्टॉक्स बाबत माहिती देत आहेत, जे एका वर्षापासून सतत भरपूर प्रमाणात रिटर्न देत आहेत. या शेअर्सनी एका वर्षात 192 टक्क्यांपर्यंत भरपूर प्रमाणात रिटर्न दिला आहे. शेअर बाजाराच्या भाषेत यांना मल्टीबॅगर स्टॉक्स असे म्हणतात.

OnMobile Global : या टेलीकम्‍यूनिकेशन कंपनीच्या शेअर्समध्येही एका वर्षात 83 टक्क्यांची वाढ झाली आहे. मंगळवार, 26 एप्रिल रोजी देखील हा शेअर इंट्राडेमध्ये 0.72 टक्क्यांच्या वाढीसह 182.50 रुपयांवर ट्रेड करत होता. गेल्या एका महिन्यात या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 61% रिटर्न दिला आहे. त्याचबरोबर 2022 मध्ये आतापर्यंत 73 टक्के नफा दिला आहे.

Raymond : या शेअर्सनेही गेल्या वर्षभरात आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. मंगळवार, 26 एप्रिल रोजी Raymond च्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे आणि हा शेअर बीएसईवर 0.81 च्या वाढीसह 892.45 रुपयांवर ट्रेड करत होता. या शेअर्सने एका वर्षात 179.50 टक्के मोठा रिटर्न दिला आहे, तर गेल्या सहा महिन्यांत तो 98 टक्क्यांनी वाढला आहे.

Alcargo Logistics : ही कंपनी भारतासह जगातील अनेक देशांमध्ये इंटिग्रेटिड लॉजिस्टिक आणि वाहतूक सेवा पुरवते. Alcargo Logistics च्या या शेअर्सने एका वर्षात 193 टक्के मोठा रिटर्न दिला आहे. आजही हा शेअर तेजीत होता, जो 0.63 टक्क्यांच्या वाढीसह 359.45 रुपयांवर ट्रेड करत होता. सहा महिन्यांत स्टॉक 31 टक्क्यांनी वाढला आहे.

Shankara Building Products : होम इम्‍प्रुवमेंट आणि बिल्डिंग प्रोडक्‍टचा रिटेलर असलेल्या Shankara Building Products लिमिटेडच्या शेअर्समध्येही गेल्या वर्षभरात जोरदार उसळी पाहायला मिळाली आहे. या शेअर्सने एका वर्षात 103% भरपूर रिटर्न दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत तो 38 टक्क्यांनी वाढला आहे, त्यानंतर 2022 मध्ये त्याने गुंतवणूकदारांना 47 टक्के नफा दिला आहे.

Sarda Energy & Minerals : कॅप्टिव्ह आयर्न आणि स्टील उत्पादक कंपनी असलेल्या Sarda Energy & Minerals चे शेअर्स देखील मल्टीबॅगर स्टॉक आहे. या शेअर्सने एका वर्षात 163 टक्के रिटर्न दिला आहे. गेल्या सहा महिन्यांत स्टॉक 50 टक्क्यांनी वाढला आहे आणि 2022 मध्ये 58 टक्के रिटर्न दिला आहे. मंगळवार, 26 एप्रिल रोजी हा शेअर बीएसईवर इंट्राडेमध्ये 1246.65 रुपयांवर ट्रेड करत होता.

टीप : येथे नमूद केलेले स्टॉक ब्रोकरेज हाऊसच्या सल्ल्यावर आधारित आहेत. तुम्हाला यापैकी कोणत्याही शेअर्समध्ये गुंतवणूक करायची असेल, तर पहिले सर्टिफाइड गुंतवणूक सल्लागाराकडून माहिती घ्या. तुम्हांला होणार्‍या कोणत्याही नफा किंवा तोट्यासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.