‘यामाहा’ची लोकप्रिय स्पोर्ट बाइक ‘R15’ नव्या अवतारात लाँच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र। दुचाकी निर्मिती मध्ये अग्रगण्य असणाऱ्या ‘यामाहा’ कंपनीने आपली लोकप्रिय स्पोर्ट्स बाइक यामाहा R15 V3 (Yamaha R15) नव्या BS-6 इंजिनसह लाँच केली आहे. यापूर्वी यामाहाने BS6 इंजिनसह FZ आणि FZS या दोन बाइक्स भारतात लाँच केल्या आहेत. R15 V3 च्या BS6 व्हर्जनची किंमत 1.46 लाख रुपये(एक्स-शोरुम) आहे.

यापूर्वीच्या BS4 व्हेरिअंटपेक्षा नव्या बाइकची किंमत चार हजार रुपयांनी अधिक आहे. सध्या जवळपास सर्वच कंपन्यांनी भारतात एप्रिल 2020 पासून लागू होत असलेल्या बीएस-6 मानकांसह वाहनं अपग्रेड करण्यास सुरूवात केली आहे.

दरम्यान या बाइकमध्ये 155cc, SOHC, 4-व्हॉल्व, लिक्विड-कूल्ड, फ्युअल इंजेक्टेड इंजिन आहे. हे इंजिन 10,000rpm वर 19.3hp ची ऊर्जा आणि 8,500rpm वर 15Nm टॉर्क निर्माण करतं. यामध्ये 6-स्पीड ट्रांसमिशनचा पर्याय असून या स्पोर्ट्स बाइकमध्ये स्लिपर क्लच, गिअरशिफ्ट लाइटसह डिजिटल मल्टी-फंक्शनल इंस्ट्रुमेंट क्लस्टर, एलईडी हेडलाइट आणि एलईडी टेललाइट यांसारखे फीचर्स आहेत.