Yamaha RX 100 : फक्त 60 हजार रुपयांना इथे मिळतेय बेस्ट बाईक; आजच करा बूक..

Yamaha RX 100
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भारतीय बाजारात एकामागून एक दमदार आणि अपडेटेड बाईक्स लाँच होत आहेत. होंडा, हिरो, tvs यासारख्या दुचाकी सध्या जोरदार फॉर्मात आहेत. मात्र देशातील तरुणाईला अजूनही Yamaha च्या RX100 ची भुरळ कायम आहे. दमदार इंजिन आणि लूक असलेल्या या बाईकची किंमत सध्याच्या मार्केट मध्ये लाखोंच्या घरात आहे. त्यामुळे इच्छा असूनही काही जण ती खरेदी करू शकत नाहीत. परंतु आज आम्ही तुम्हांला फक्त 60 हजार रुपयांत RX100 कुठे खरेदी करता येईल याबाबत सांगणार आहोत.

मित्रानो, जुन्या वस्तूंची विक्री करणाऱ्या OLX वर अवघ्या 60 हजार रुपयांत Yamaha RX 100 उपलब्ध आहे. यामाहाच्या या बाईकचे १९९६ चे मॉडेल असून १ लिटर पेट्रोलमध्ये ४० किलोमीटर ऍव्हरेज देतेय. जर तुम्ही बाजारात नवीन गाडी घ्यायला गेलात तर १ लाखांपेक्षा जास्त किंमत तुम्हाला मोजावी लागण्याची शक्यता आहे . त्यामुळे हि ६० हजार रुपयातील Yamaha RX 100 खरेदी करणं तुमच्यासाठी नक्कीच बेस्ट डील ठरू शकते.

Yamaha RX 100 दमदार इंजिन आणि स्टायलिश लुकसाठी ओळखली जाते. ९० च्या दशकात तर तरुणाईला या बाईकने चांगलीच भुरळ घातली होती. अजूनही नव्या दमाच्या तरुणाना या गाडीचे वेड आहे. सध्या बाजारात नवनवीन लाँच झालेल्या गाड्यांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. परिस्थितीनुसार, सर्वानाच नवीन गाडी घेणं परवडत नाही अशावेळी पैशाची बचत करण्यासाठी तुम्ही जुनी परंतु चालवायला मजबूत अशी गाडी खरेदी करू शकता. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी ही खास ऑफर घेऊन आलो आहोत.