Yashasvi Jaiswal Double Century : यशस्वी जयस्वालचे खणखणीत द्विशतक; चौकार- षटकारांचा पाऊस

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Yashasvi Jaiswal Double Century : भारताचा आक्रमक सलामीवीर यशस्वी जयस्वालने इंग्लडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात (IND Vs ENG) खणखणीत द्विशतक मारलं आहे. यशस्वीच्या कारकिर्दीतील ही पहिलीच डबल सेंचुरी आहे. यशस्वीने अवघ्या 277 चेंडूत 200 धावांचा आकडा गाठला. यादरम्यान त्याने 18 चौकार आणि 7 षटकार मारले. त्याच्या या खेळीमुळे सध्या भारताचा स्कोर ३८३-७ असा आहे.

यशस्वीची आक्रमक फलंदाजी – Yashasvi Jaiswal Double Century

खापट्ट्नम येथील कसोटी सामन्याचा आजचा दुसरा दिवस आहे. पहिल्या दिवशी टीम इंडियाने 6 गडी गमावून 336 धावा केल्या होत्या. आज यशस्वी जैस्वाल आणि रविशचंद्रन अश्विन यांनी डाव पुढे नेला. अश्विन २० धावांवर जेम्स अँडरसनच्या चेंडूवर बाद झाला. परंतु यशस्वी जैस्वालची तुफान फटकेबाजी सुरूच ठेवत ऐतिहासिक डबल सेंचुरी मारली. यशस्वीने मैदानाच्या चारही बाजूला चौफेर टोलेबाजी करत चौकार- षटकारांचा पाऊस पाडला. खास करून इंग्लडच्या फिरकीपटूंवर त्याने हल्ला केला.

वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिपमध्ये भारतीय संघाकडून द्विशतकी खेळी करणारा यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal Double Century) चौथा खेळाडू ठरला आहे. यापूर्वी रोहित शर्मा, विराट कोहली आणि मयंक अग्रवालने डबल सेंचुरी मारण्याचा कारनामा केला आहे. तर सर्वात कमी वयात द्विशतक ठोकणारा यशस्वी भारताचा तिसरा खेळाडू ठरला आहे. त्याच्यापूर्वी सुनील गावस्कर आणि विनोद कांबळी यांनी हा विक्रम केला होता. सुनील गावस्कर यांनी वयाच्या २१ वर्षे २२७ दिवसांत कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले. तर विनोद कांबळीने वयाच्या २१ वर्षे ३२ दिवसांत द्विशतक ठोकले होते. आता यशस्वी जयस्वालने वयाच्या 22 वर्षे 37 दिवसात डबल सेंचुरी मारली आहे.