कराड । कराड पंचायत समितीच्या वतीने देण्यात येणारे स्व. यशवंतराव चव्हाण गुणवंत शिक्षक पुरस्कार या वर्षी 28 शिक्षकांना व एक केंद्र प्रमुख यांना प्रदान करण्यात आला. कराड पंचायत समितीच्या बचत भवन मध्ये शाहीर डॉ. आझाद नायकवडी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. सन्मानचिन्ह व सन्मानपत्र, मनाचा फेटा असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी- मीना साळुंखे होत्या. यावेळी कराड पंचायत समितीचे माजी उपसभापती रमेश देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रदीप पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अँड. शरद पोळ, काशिनाथ कारंडे, गटशिक्षणाधिकारी सन्मती देशमाने, अधीक्षक विजय परिट, विस्तारअधिकारी जमिला मुलाणी, शिक्षक संघटनाचे अध्यक्ष, पदाधिकारी, शिक्षक बँक व सोसायटीचे संचालक यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना रमेश देशमुख म्हणले, शिक्षकांना काम करताना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे म्हणून हे पुरस्कार सुरु केले आहेत. जिल्ह्यात सगळीकडे पुरस्कार दिले जातात परंतु आपल्याकडे दिले जात नव्हते म्हणून आम्ही स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने पुरस्कार देणे सुरु केले आहे. हे कायम स्वरूपी पुढे चालावेत. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी सन्मती देशमाने यांनी केले. सूत्रसंचालन अनंत आघाव व वैशाली रोकडे यांनी केले. आभार जमिला मुलाणी यांनी मानले.
पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नांवे व कंसात जिल्हा परिषद शाळा गाव पुढीलप्रमाणे : सदाशिव अनंत आमणे (केंद्रप्रमुख- ओंड), मनिषा आबासो साठे (दक्षिण तांबवे) जयवंत विलास सगरे (सुर्ली), प्रकाश गणपती कदम (चरेगाव), सुमन जालिंदर पवार (किवळ), गौतमी जगन्नाथ धुमाळे (कार्वे- मुले), संदीप रामचंद्र संकपाळ (बेलवाडी), दत्तात्रय अण्णा मोहिते (धावरवाडी), आशाराणी तानाजी पाटील (सैदापूर), हणमंत बाळकृष्ण यादव (धोंडेवाडी), शुभांगी सोमनाथ गुजर (कोळेवाडी), माणिक मारुती तडाके (संजयनगर- मसूर), मनीषा मारुती पवार (कोयनावसाहत), धनाजी पांडुरंग कोळी (पाचुपतेवाडी), शामराव रामचंद्र चव्हाण (शिरगाव), शबाना फैयाज संदे (खुबी), बाळासो तुकाराम पाटील (वस्ती साकुर्डी), रामहरी तुकाराम वनवे (उंब्रज- मुली), दीपक पांडुरंग पवार (मनू), आनंदराव तुकाराम पाटील (तासवडे), स्वाती अनंत आघाव (वडगाव हवेली), शोभा जगन्नाथ बोडरे (यादव मळा), विमल हणमंत मोरे (चचेगाव), कृष्णा जयसिंग शिंदे (येणपे), सर्जेराव तातोबा साठे (म्हासोली), संजय पांडुरंग बांदेकर (साळशिरंबे), संदीप शिवलिंग गुळवे (ओंडोशी), हणमंत रामहरी मंडले (गोटे), राजेंद्र शिवाजी चव्हाण (तुळसण)