.. अन ‘त्या’ संतप्त शेतकऱ्यानं शेतातील सोयाबीन दिले पेटवून, नुकसान भरपाईचे सरकारचे निकष आले आडवे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यवतमाळ । यावर्षी अतिवृष्टीमुळं राज्यातील अनेक जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालं आहे. त्यामुळं आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीसाठी नुकसानीचा आढावा घेणं सुरु आहे. नुकसान भरपाईसाठी काही निकष ठरवले गेले आहेत. आपण या निकषांमुळं अनेक शेतकरी मदतीपासून वंचित राहणार असल्याचे चित्र आहे. त्यामुळं शासनाच्या याचं निकषांमुळं मदतीपासून वंचित ठरवल्या गेलेल्या यवतमाळ जिल्ह्यात एका शेतकऱ्याने चक्क सोयाबीन जाळून आपला संताप व्यक्त केला.

यंदा राज्यातील शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटांनी ग्रस्त आहे. सुरवातीला दुबार पेरणीला सामोरे जावे लागले. कशीबशी पैशाची जुळवाजुळव करून शेतकऱ्यांनी दुबार पेरणीही केली. शेतकऱ्यांना पदरी दोन पैसे पडतील, अशी आशाही निर्माण झाले होती. पण परतीच्या पावसाने पिकांचे मातेरे केले. उरल्यासुरल्या आशाही नष्ट झाल्यात. मनिष जाधव असे या शेतकऱ्याचे नाव आहे.मात्र, मायबाप सरकार या संकटकाळी पाठीशी उभं राहिलं असा विश्वास असलेल्या शेतकऱ्यांना शासनाचे निकष आडवे येत आहेत. अशाच शेतकऱ्यांपैकी एक आहेत महागावचे मनीष जाधव.

पावसाने उसंत घेतल्याने त्यांनी सोयाबीन सोंगणीस सुरवात केली. सोयाबीनच्या नुकसानीची कल्पना अधिकाऱ्यांना दिली असता सरकारी निकषात आपला तालुका बसत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. संतप्त झालेल्या मनीष यांनी सरकारचा निषेध व्यक्त करीत आपल्या शेतातील सोयाबीन पेटवून दिले. जिल्ह्यात शेतकऱ्यांचे परतीच्या पावसाने कंबरडे मोडले आहे. सरकारी निकष बदलून शेतकऱ्यांना सरसकट मदत देणे गरजेचे आहे.

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in