Tuesday, June 6, 2023

धक्कादायक ! ‘या’ जिल्ह्यात जादूटोण्याच्या संशयावरून संपूर्ण कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळमध्ये एक हादरवणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये जादूटोण्याच्या संशयावरुन एका कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. या कुटुंबावर जीवघेणा हल्ला करुन त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हि घटना यवतमाळ जिल्ह्यातील तरोडा गावामध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील तरोडा गावात जादूटोण्याच्या संशयावरुन एका कुटुंबावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर या कुटुंबाचे घर जाळण्यात आले. या संपूर्ण घटनेत चौघे जण जखमी झाले आहेत. यांच्यापैकी एकजण गंभीर जखमी झाला आहे तर तीन जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नागपुरातील सीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ग्रामस्थांनी केलेल्या हल्ल्यात विनायक भोरे हे गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यात त्यांचे संपूर्ण घर आगीत जळून खाक झाले आहे. भोरे कुटुंबीय जादूटोणा करत असल्याचा ग्रामस्थांना संशय होता आणि त्या संशयातूनच त्यांनी हे कृत्य केलं आहे. या हल्ल्यात भोरे कुटुंबाचे घर पूर्णत: जळून खाक झाल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे यवतमाळ जिल्हा हादरला आहे.