धक्कादायक ! यवतमाळध्ये शेतकऱ्याची विषप्राशन करून आत्महत्या

suicide
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

यवतमाळ : हॅलो महाराष्ट्र – यवतमाळमध्ये एका शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे हातचे पीक गेल्यामुळे आत्महत्या (suicide) केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील चोपण गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी हि मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. गजानन उर्फ सुरेश खिरटकर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. मृत गजानन यांची एकूण 9 एकर शेती होती. शेतातील पिक अतिवृष्टीमुळे पुरती झोपली होती. पिकांच्या झालेल्या अतोनात नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला होता. अखेर नैराश्यातून या शेतकऱ्याने विष पिऊन आपली जीवनयात्रा (suicide) संपवली आहे.

निसर्गाच्या लहरीपणामुळे राज्यातील शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. सरकारी घोषणा आणि सरकारी मदत शेतकऱ्यांपर्यंत वास्तवात किती पोहोचली, यावरुनही अनेक सवाल विरोधकांकडून उपस्थित होत आहेत. अशातच नव्या सरकारच्या अवघ्या काही दिवसांची आकडेवारी पाहता शेतकरी आत्महत्येचा (suicide) गंभीर प्रश्न महाराष्ट्र सरकार समोर निर्माण झाला आहे.

कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या (suicide) केली आहे. मालेगावातील नांदगावच्या बाणगाव बुद्रूक या ठिकाणी हि घटना घडली आहे. आपल्या राहत्या घरातच त्याने गळफास लावून आत्महत्या (suicide) केली आहे. जनार्दन कवडे असे या मृत शेतकऱ्याचे नाव आहे. त्याच्यावर दोन लाख रुपयांचे कर्ज होते. ते दोन लाख रुपयांचं कर्ज कसे फेडायचे याच चिंतेतून त्याने आत्महत्या केली आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर