यवतमाळ प्रतिनिधी । नुसत्या साप नावाने भल्याभल्यांना कापरे भरते, अश्यात चवताळलेला नागासमोर आला तर आणि तोही मुंगसासी दोन हात करताना… अशा वेळी आपला थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही, आणि असा थरार पाहायला मिळणंही दुर्मिळच आहे, पण हा थरार यवतमाळ जिल्ह्यातील जेवली-मोरचंडी वासियांनी अनुभवला आणि आपल्या कॅमेऱ्यात टिपला सुद्धा.
गारोड्याच्या खेळात साप आणि मुंगूस सर्वांनीच पाहिलंय. गारोडी म्हणतो आता सापाची आणि मुंगसाची लढाई होणार, मात्र गारोड्याच्या खेळात ती लढाई आजवर कुणी पाहिलीच नाही, मात्र यवतमाळ जिल्ह्यातील जेवली- मोरचंडीवासी याला अपवाद ठरले, या गावकऱ्यांनी रस्त्यालगत नागाची आणि मुंगसाची लढाई पाहिली आणि हा थरार पाहतांना सारेच भेदरले.
जेवली मोर्चांडी गावातील नागरिक आपल्या दैनंदिन सवयीप्रमाणे रस्त्याने येत जात होते, परंतु अचानक रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झुडपातून साप आणि मुंगूस बाहेर आले आणि मग सुरु झाली या दोघांची लढाई. मुंगुसाने सापाला आपल्या जबड्यात पकडले असल्याने सापाला काही सुटका करता येईना, पण सापाचे प्रयत्न मात्र सुरूच होते. काही मिनिटे सुरु असलेल्या या थरार नंतर मुंगसाने सापाला पुन्हा झुडपात ओढत नेले. पण तो पर्यंत या दोन्ही बहाद्दराच्या भांडणांनाही मात्र रस्त्याची पूर्ण वाहतूक थांबवली होती.