Yoga During Menstruation | मासिक पाळीत योगा करणे योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ञांचे मत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Yoga During Menstruation | योगा, व्यायाम हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यामुळे आपण योगा आणि व्यायाम दररोज केला पाहिजे. परंतु मासिक पाळीमध्ये अनेक महिलांनी व्यायाम आणि योगा करू नये, असे अनेकजण म्हणतात. कारण या काळात जास्त पोट दुखी देखील होत असते. परंतु तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार मासिक पाळीत (Yoga During Menstruation ) तुम्ही हलक्या स्वरूपाचा व्यायाम करणे. तुमच्या शरीराला फायदेशीर ठरू शकते. तुम्ही जास्त व्यायाम करण्याऐवजी अगदी लहान सहान योगासने आणि व्यायाम करू शकता.

मासिक पाळीच्या काळात योगासने करण्याचे फायदे | Yoga During Menstruation

मासिक पाळीत मलासन, तितलीयासन, धनुरासन यासारखे योगासन करणे फायदेशीर ठरते. यामुळे वेदना आणि क्रॅम्प्सची समस्या कमी होते. योगा व्यतिरिक्त, अनुलोम-विलोम आणि भ्रामरी प्राणायाम केल्याने देखील मासिक पाळी दरम्यान होणारी मूड स्विंगची समस्या दूर होते. या आसनांच्या मदतीने अंतर्गत अवयवांची योग्य प्रकारे मालिश केली जाते, ज्यामुळे वेदना तर दूर होतातच पण या काळात अनेक महिलांना पचनाशी संबंधित समस्यांनाही सामोरे जावे लागते, त्यामुळे त्यांना त्यातही फायदा होतो. हातपाय दुखणेही कमी होते.

मासिक पाळी दरम्यान कोणती काळजी घ्यावी?

  • मासिक पाळीचे पहिले दोन-तीन दिवस योग करणे टाळावे.
  • खूप कठीण आसने करू नका, फक्त आरामदायी आसने करा.
  • सराव करताना ताण देऊ नका.
  • पाठ, पोट आणि मान दुखत असेल तर योगा करू नका.
  • जास्त रक्तस्त्राव होत असला तरी योगासने करणे टाळावे.
  • शिर्षासन, सर्वांगासन किंवा कोणतीही उलटी आसने, कपालभाती आणि भस्त्रिका यांसारखी आसने मासिक पाळीत करू नयेत.
  • मासिक पाळीत योगासने फक्त तज्ञांच्या सल्ल्यानुसार आणि देखरेखीखाली करा.