Yoga For Lung Strength | आजकाल लोकांची जीवनशैली खूप बदललेली आहे. सगळ्यांचे आयुष्य अगदी धावपळीचे झालेले आहे. त्याचप्रमाणे वातावरणात देखील खूप बदल झालेले आहे. अति प्रदूषण त्याचप्रमाणे अनेक विषाणू वाढलेले आहेत. या सगळ्याचा मानवी आरोग्यावर मात्र मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. आज काल अनेक लोकांना फुफुसाच्या समस्या निर्माण झालेल्या आहे. त्यामुळे फुफ्फुसाची क्षमता देखील कमकुवत झालेली आहे.
या सगळ्या परिस्थितीत आपण आपल्या आरोग्यासाठी काही योगासनांचा (Yoga For Lung Strength) वापर करणे खूप गरजेचे असते. आयुर्वेदामध्ये योगासनाला खूप जास्त महत्त्व आहे. निरोगी आरोग्यासाठी रोज योगा करण्याचा सल्ला दिला जातो. अशातच आता येथे 21 जून 2024 रोजी जागतिक योग दिन साजरा होत आहे. यानिमित्त आपण आता फुफुसांना बळकट करण्यासाठी काही योगासनांची माहिती जाणून घेऊया.
उष्ट्रासन
तुमच्या फुफुसांची क्षमता वाढवण्यासाठी त्याचप्रमाणे फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी तुम्ही हे उष्ट्रासन करू शकता. हे केल्याने तुम्हाला श्वासासंबंधीच्या अनेक समस्या देखील दूर होतात. यासाठी तुम्ही गुडघ्यावर बसा त्यानंतर आपले हात आपल्या नितंबावर ठेवा आणि आपले पाय आपल्या हातांनी धरा. आपली कंबर मागे वाकवा तुम्ही 30 सेकंद या स्थितीत थांबा.
त्रिकोणासन | Yoga For Lung Strength
फुफुसांची ताकद वाढवण्यासाठी त्रिकोणासन खूप महत्त्वाचे आहे. यामुळे फुफ्फुसाचे स्नायू देखील मजबूत होतात. हे करण्यासाठी तुम्ही एका सरळ रेषेत उभे रहा. दोन्ही पायांमधील अंतर राखून हात मांडीजवळ ठेवा. त्यानंतर श्वास घेताना हात डोक्याच्या वर घ्या. आता श्वास सोडताना शरीर डावीकडे वळवा. यावेळी तुम्ही गुडघे वागू नका.
मत्सासन
या आसनाचा उपयोग खूपच मजबूत करण्यासाठी होतो. असे केल्याने तुमचे आरोग्य निरोगी राहते. त्यामुळे हे योगासन नियमित करणे गरजेचे आहे. हे असं करण्यासाठी तुम्ही पायाना पद्मासनात ठेवून पुढील बाजूने झोपा. या स्थितीमध्ये श्वास आत घ्या आणि कमरेला उंच उचला या स्थितीमध्ये शरीरातील नितंब आणि डोके हे खालच्या बाजूला जमिनीवर ठेवायचे. आणि कंबर वर उचलायची तुम्ही पाच मिनिटापर्यंत हळूहळू हे असं करू शकता.
भुजंगासन
तुम्ही जर भुजंगासनाचा नियमितपणे सराव केला, तर तुमची फुफ्फुसे मजबूत होतात. त्यामुळे या आसनाचा रोज सराव करा त्याचप्रमाणे खांदे आणि मनक्याशी संबंधित काही समस्या असेल तर त्या देखील दूर होतील. यासाठी तुम्हाला पाठीवर झोपावे लागेल. त्यानंतर तुमचे दोन्ही पाय जवळ करा. आणि दोन्ही पाय छातीच्या बाजूने जमिनीवर टिकून ठेवा. त्यानंतर हनवटी जमिनीला टेकलेली असेल लांब श्वास घेत दोन्ही हातांवर भार देत वर उठा.