Tuesday, January 7, 2025

Yoga | ‘या’ 3 योगासनांनी सुधारेल रक्ताभिसरण; चेहऱ्याची चमक वाढण्यासोबतच होतात ‘हे’ फायदे

Yoga | आपल्या शरीरामध्ये रक्ताभिसरण योग्य प्रमाणात होणे. खूप गरजेचे असते. रक्ताभिसरण योग्य नसले, तर शरीरा संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. पचनसंस्था खराब राहते. त्यामुळे चेहऱ्यावर देखील चमक येत नाही. केसांशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. अशा वेळी तुम्ही काही योगासनांच्या मदतीने तुमचा रक्तभिसरण सुधारू शकता. योगा (Yoga) करणे हे अनेक समस्यांवरचा उपाय आहे. तुम्ही केवळ रोज 15 ते 20 मिनिटे व्यायाम केला, तरी तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. आणि सुंदर देखील दिसू शकता. आता हे योगासन कोणते आहेत? हे आपण जाणून घेऊया.

सर्वांगासन | Yoga

हे आसन केल्याने संपूर्ण शरीरात रक्ताचा प्रवाह सुरळीत होतो. यामुळे चेहरा आणि केसांची समस्या दूर होते. पचनाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो. हे आसन केल्याने चेहऱ्याकडे रक्ताभिसरण होऊन दीर्घकाळ तरूण आणि सुंदर राहण्यास मदत होते.

हलासना

चेहरा आणि पाचक अवयवांमध्ये रक्ताभिसरण वाढवण्यासाठी हलासनाचा सराव करा. थायरॉईडच्या रुग्णांसाठीही हे आसन खूप फायदेशीर आहे. हे आसन पोटाची चरबी कमी करण्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. या आसनाचा रोज थोडा वेळ सराव केल्याने चेहऱ्याची चमक वाढू लागते. गॅस, अपचन, फुगवणे यांसारख्या समस्याही निघून जातात, पण पाठ आणि मान दुखत असल्यास सराव करू नका.

हेडस्टँड | Yoga

चेहरा आणि केसांमध्ये रक्ताभिसरण वाढवण्यासाठी शीर्षासनाचा सराव खूप फायदेशीर आहे. यामुळे मेंदूला आवश्यक प्रमाणात रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होतो, एवढेच नाही तर पचन अवयवही निरोगी राहतात. मात्र, हे आसन करणे थोडे कठीण आहे. भिंतीचा आधार घेऊन हे आसन करण्याचा सराव करा. जास्तीत जास्त वेळ या आसनात राहण्याचा प्रयत्न करा, तरच तुम्हाला फायदा होईल.