नवी दिल्ली । आजकाल लोकांचे आयुष्य व्यस्त झाले आहे. अशा परिस्थितीत अनेक वेळा लोकांना बँकेच्या शाखेत जाता येत नाही. बँकेची महत्त्वाची कामं बँकेच्या शाखेत न जाता पार पडली तर किती चांगले होईल ? जर तुमचे खाते पंजाब नॅशनल बँकेत म्हणजेच PNB मध्ये असेल तर तुम्हाला खात्यातील बॅलन्स जाणून घेण्यासाठी बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही. वास्तविक, पंजाब नॅशनल बँक तुम्हाला घरबसल्या खात्यातील बॅलन्सची माहिती मिळवण्याची सुविधा देते.
‘या’ नंबरवर मिस्ड कॉल करा
तुम्ही तुमच्या PNB खात्यातील बॅलन्स फक्त एका मिस्ड कॉलने तपासू शकता. यासाठी, तुम्हाला तुमच्या पंजाब नॅशनल बँकेच्या खात्यात रजिस्टर्ड असलेल्या तुमच्या मोबाईल क्रमांकावरून 1800 180 2223 आणि 0120-2303090 यापैकी कोणत्याही क्रमांकावर मिस कॉल करावा लागेल. मिस्ड कॉलनंतर काही वेळातच तुम्हाला एक मेसेज येईल ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या खात्यातील बॅलन्सची माहिती मिळेल.
जर तुमची PNB मध्ये दोन खाती असतील आणि दोन्हीमध्ये एकच मोबाईल नंबर रजिस्टर्ड असेल तर तुम्ही एकाच नंबरवर दोन्ही खात्यांच्या बॅलन्सची माहिती SMS द्वारे मिळवू शकता. जर तुमच्या बँक खात्यात मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड नसेल, तर तुम्ही पंजाब नॅशनल बँकेच्या जवळच्या शाखेत जाऊन तुमचा मोबाईल क्रमांक रजिस्टर्ड करू शकता.
तुम्ही SMS पाठवूनही बॅलन्स जाणून घेऊ शकता
तुम्ही SMS पाठवूनही तुमच्या PNB खात्यातील बॅलन्स तपासू शकता. तुमच्या रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकावरून BAL टाइप करा आणि स्पेस दाबा आणि 16 अंकी खाते क्रमांक टाका आणि हा SMS 5607040 क्रमांकावर पाठवा. याच्या काही सेकंदांनंतर, संपूर्ण माहिती तुम्हाला SMS द्वारे पाठविली जाईल.