दररोज फक्त 35 रुपये वाचवून तुम्ही होऊ शकाल करोडपती, त्यासाठी काय करावे ते जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । प्रत्येकजण करोडपती होण्याचे स्वप्न पाहत असतो, परंतु प्रत्येकजण तसे बनू शकत नाही. जर तुम्हालाही करोडपती व्हायचे असेल तर त्यासाठी तुम्ही आणखी अत्यन्त हुशारीने गुंतवणूक करायला हवी. करोडपती होणे जरी सोपे नसले, तरी काही विशेष गोष्टींची काळजी घेतली गेली आणि योग्य नियोजन केले (proper planning and constant saving ) गेले आणि सतत बचत केली तर हे स्वप्न जरूर प्रत्यक्षात येऊ शकेल.

त्यासाठी काय करावे ते जाणून घ्या
बाजार तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जर तरुणांनी वयाच्या 20 व्या वर्षी नोकरी सुरू केली आणि 60 वर्षांत निवृत्त झाले ते सहज कोट्याधीश बनू शकतील. दीर्घकाळ इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास आपले करोडपती होण्याचे स्वप्न सहज साध्य होऊ शेकेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

येथे गुंतवणूक करा
तज्ञांच्या मते, दररोज 35 रुपये वाचवून तुम्ही करोडपती होण्याचे आपले लक्ष्य साध्य करू शकता. जेव्हा जेव्हा शेअर बाजारामध्ये एखादे मोठे करेक्शन येते तेव्हा त्या पातळीपासून एसआयपी (Systematic Investment Plan- SIP) सुरू करावी. नोकरीच्या अगदी सुरुवातीपासूनच दीर्घ मुदतीसाठी डायव्हर्सीफाइड इक्विटी म्युच्युअल फंडामध्ये (Diversified Equity Mutual Funds) गुंतवणूक सुरू करावी. दीर्घ कालावधीत सरासरी वार्षिक दर 12 टक्के रिटर्न गृहित धरुन चाललो तर आपण करोडपती बनू शकू. तथापि, त्यासाठी गुंतवणूकदारास दररोज अवघ्या 35 रुपयांची बचत सुरू करावी लागेल म्हणजेच दरमहा 1,050 रुपये. जर आपण वयाच्या 20 व्या वर्षी नोकरी सुरू केली असेल आणि 60 वर्षात निवृत्त होऊ इच्छित असाल तर दरमहा तुम्हाला 1,050 रुपये SIP मध्ये गुंतवावे लागतील. ते 12 टक्के कंपाऊंडिंग (कंपाऊंड इंटरेस्ट) दराने 1 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे लक्ष्य साध्य करेल.

जास्त वय असलेली लोकं देखील करोडपती होऊ शकतात
जास्त वय असलेले गुंतवणूकदारही करोडपती होऊ शकतात, यासाठी त्यांनाही काही खास गोष्टींची काळजी घ्यावी लागेल. वयाच्या 35 व्या वर्षी नोकरीला सुरूवात करणार्‍या गुंतवणूकदाराला 60 वर्षानंतर निवृत्ती घेतल्यावर कोट्याधीश व्हायचे असेल तर त्याला दरमहा 5,875 रुपये गुंतवावे लागतील. त्या गुंतवणूकीला 12 टक्के दराच्या चक्रवाढ (कंपाऊंड इंटरेस्ट) दराने सुमारे 1 कोटी रुपये मिळतील.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment