फक्त 500 रुपयांत खरेदी करू शकाल सोने, सोन्यात करा गुंतवणूक त्याद्वारे तुम्हाला मिळेल चांगले रिटर्न

Digital Gold
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । सोने कोणाला आवडत नाही? सोने हे आता नव्हे तर शतकांपासूनच समृद्धीचे प्रतीक आहे. लोकांनी त्यांची समृद्धी प्रदर्शित करणे, भावी पिढ्यांना वारसा म्हणून देणे किंवा संकट काळात वापरासाठी सोने जतन करणे ही एक प्रथा आहे. सोन्याचे हे महत्त्व आजही अबाधित आहे. मात्र सतत वाढत जाणाऱ्या किंमतींमुळे हा मौल्यवान धातू सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहे.

जरी बाजार त्याच्या तेजीने गजबजत असला तरीही लोकं आजही सुरक्षित गुंतवणुकीसाठी सोन्याकडे वळतात. गुंतवणुकीच्या बाबतीत, सोने हा एक सुरक्षित पर्याय आहे, जो दीर्घ काळापासून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देत आहे. एका चांगल्या गुंतवणूकदाराच्या पोर्टफोलिओमध्ये सोन्याचा वाटा 15-20 टक्क्यांपर्यंत असावा, असे आर्थिक सल्लागारांचे म्हणणे आहे.

सध्या लोकांचा कल वास्तविक सोन्यात गुंतवण्याऐवजी इतर पर्यायांकडे जात आहे. कारण अस्सल सोने खरेदी करणे प्रत्येकाला शक्य नसते. सोन्याला इतर पर्याय आल्यापासून सामान्य माणसानेही सोन्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. गोल्ड बॉण्ड्स, गोल्ड ईटीएफ आणि म्युच्युअल फंडाद्वारे सोन्यात गुंतवणूक करता येते.

चांगले रिटर्न मिळवण्यासाठी गोल्ड म्युच्युअल फंड हा एक सुरक्षित मार्ग आहे. येथे गुंतवणूक करून, तुम्हाला फिजिकल गोल्ड प्रमाणेच सोन्याच्या देखभालीची काळजी करण्याची गरज नसते. असे अनेक म्युच्युअल गोल्ड फंड आहेत ज्यांनी FD पेक्षा जास्त रिटर्न दिला आहे.

तुम्ही 500 रुपयांना सोने खरेदी करू शकता

म्युच्युअल फंडांद्वारे सोन्यात गुंतवणूक करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्ही त्यात 500 रुपयांचे सोने देखील खरेदी करू शकता. तुम्ही SIP द्वारे दरमहा सोन्यात गुंतवणूक करू शकता. इतर कोणत्याही म्युच्युअल फंडाप्रमाणे ही गुंतवणूक करता येते.एक्सिस गोल्ड फंड, कोटक गोल्ड फंड, एसबीआय गोल्ड फंड आणि एचडीएफसी गोल्ड फंड हे काही गोल्ड फंड आहेत जे चांगले रिटर्न देत आहेत.

कोटक गोल्ड फंड

अशा म्युच्युअल फंड योजनांमध्ये, कोटक वर्ल्ड गोल्ड फंड हा एक आंतरराष्ट्रीय फंड आहे जो सोन्याच्या मायनिंग कंपन्या आणि त्याचे मार्केटिंग करणाऱ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. या योजनांचे रिटर्न सोन्याच्या दैनंदिन हालचालीशी जोडलेले आहेत. म्हणून, या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी एखाद्याने सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन  (SIP) किंवा सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅन (STP) वापरावे.गोल्ड म्युच्युअल फंड हे ओपन-एंडेड प्रॉडक्ट आहे जे गोल्ड ईटीएफमध्ये गुंतवणूक करते. असे अनेक गोल्ड फंड आहेत, ज्यांनी फक्त 3 वर्षात 14 ते 15 टक्के रिटर्न दिला आहे.