हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सध्या महागाईने उच्चांक गाठला असून भविष्यातील आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी पैशाची बचत आणि योग्य गुंतवणूक ही काळाची गरज ठरली आहे. थेंबे थेंबे तळे साचे या म्हणीप्रमाणेच आपणही कमी रक्कमेची गुंतवणूक करून खूप सारे पैसे साठवू शकतो. अशाच एका पोस्ट ऑफिसच्या योजने बद्दल आपण जाणून घेऊया ज्यामध्ये आपण कमीत कमी 100 रुपयांची गुंतवणूक करून खूप रक्कमी जमा करू शकतो
होय, आज आपण बोलत आहोत पोस्ट ऑफिसच्या रिकरिंग डिपॉझिट योजनेबद्दल ( RD ). अत्यंत सुरक्षित असलेल्या या योजनेत आपण दरमहा कमी पैसे जमा करून चांगला फंड तयार करू शकता. आपण या योजनेत 5 वर्षांसाठी गुंतवणूक करू शकता. तुम्ही या रिकरिंग डिपॉझिट योजनेमध्ये कमीत कमी 100 रुपये देखील गुंतवू शकता. तुम्ही 10 च्या पटीत कितीही रक्कम जमा करू शकता. तर जास्तीत जास्त रकमेवर मात्र कोणतीही मर्यादा नाही.
खूप व्याज मिळवा
पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीमवर सध्या 5.8 टक्के व्याज दिले जात आहे. पोस्ट ऑफिसमध्ये पाच वर्षांसाठी रिकरिंग डिपॉझिट खाते उघडले जाते. या खात्यात जमा केलेल्या पैशांवर दर तीन महिन्यांनी व्याज मोजले जाते.
खाते कसे उघडायचे
तुमच्या जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन तुम्ही आरडी खाते उघडू शकता. आपण इच्छित असल्यास, आपण आपल्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यासह संयुक्त खाते देखील उघडू शकता. तुम्ही हे खाते रु. 100 ने सुरू करू शकता.