हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आपल्या हक्काचं स्वतःचं घर असावं. असे प्रत्येक व्यक्तीचा स्वप्न असते. परंतु आजकाल महागाई तसेच इतर गोष्टी इतक्या प्रमाणात वाढलेल्या आहेत की, त्यामुळे हे घर घेण्याचे स्वप्न तसेच राहून जाते त्याचप्रमाणे आजकाल घरांच्या किमती देखील मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आहेत. त्यामुळे एक रकमी घर घेणे हे अनेक लोकांना शक्य होत नाही. त्यामुळे अनेकदा लोक होम लोनच्या माध्यमातून घर खरेदी करतात. परंतु एकदा होम लोन घेतले असताना आणखी एक घरी घेण्याचा विचार लोकांच्या मनात येतो. परंतु आता एक होमलोन असताना दुसरे होम लोन तुम्हाला घेता येते की, नाही? याबद्दलची माहिती आपण जाणून घेणार आहोत. एक होम लोन घेतल्यानंतर जर तुम्हाला दुसरं होम लोन घ्यायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला टॉप-अप लोन घेता येईल. आता आपण या टॉप अप होम लोनची माहिती आणि व्याजदर जाणून घेणार आहोत.
टॉप अप होम लोन
या टॉपअप होम लोनमध्ये तुम्हाला खूप चांगल्या डील्स देखील मिळतात. जर एखाद्या ग्राहकाने त्यांच्या कर्जाच्या बारा महिन्यांचा ईएमआय अजिबात स्लिप न करता भरला असेल, तर त्यांच्यासाठी टॉप-अप होम लोनचा पर्याय चांगला आहे. या कर्जाचा कालावधी हा बँकांनुसार वेगवेगळा असतो. नॉर्मल होम लोन आणि टॉपअप होम लोनच्या व्याज दरात एक ते दोन टक्क्यांचा फरक असतो. टॉप-अप होम लोनचा व्याजदर हा सामान्य लोनपेक्षा जास्त असतो.
अशाप्रकारे जर तुम्ही एक होम लोन घेतले असेल आणि दुसऱ्या होम लोनसाठी तुम्ही अप्लाय केले असेल, तर तुम्ही टॉप होम लोनचा पर्याय निवडू शकता. यामुळे तुमच्या दुसऱ्या घराचे स्वप्न देखील लवकरच पूर्ण होईल. आज-काल अनेक लोक एकापेक्षा जास्त घरे विकत घेतात. अशावेळी ते टॉप-अप होम लोनचा आधार घेतात. या होम लोनच्या आधारे त्यांना त्यांच्या स्वप्नातील घर उभे करता येते.