ससे पालनातून इंजिनियर पठ्ठ्या कमवतोय महिन्याला 90 हजार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अनेकजण शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालनाचा व्यवसाय सुरु करतात. कारण त्यातून चांगले पैसे मिळतात. काही जण पाळीव प्राणी देखील पाळतात. असाच ससेपालनाचा व्यवसाय कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निलेश गोसावी या इंजिनिअर तरुणाने सुरु केला आहे. मोठ्या पगाराची इंजिनिरींगची नोकरी सोडून ससे पालनातून आता तो चांगले पैसे कमवू लागला आहे.

आजच्या काळात शेती करत असताना अनेकजण त्याच्याशी निगडित जोडधंदा सुरु करतात. शेतकरी मित्रानो, युमहालाही जोडव्यवसाय सुरु करायचा असेल आणि त्यासाठी सरकारी योजनांची माहिती मिळवायची असेल तर चिंता करू नका. Hello Krushi हे अँप मोबाईल मध्ये install करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही योजनांची माहिती मिळवू शकता. याशिवाय आसपास असणाऱ्या इतर शेतकऱ्यांशी, कृषीतज्ज्ञांशी संपर्कसुद्धा साधू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन hello Krushi डाउनलोड करा. App ओपन होताच तुम्हाला पशुपालन आणि कृषी योजना पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करताच तुम्हाला शेळी पालन, डेअरी फार्मिंगसाथीचे अर्थसहाय्य्य आदींसह इतर योजनांची माहिती मिळेल. त्यासाठी हॅलो कृषी डाउनलोड करा.

Hello Krushi हे अँप Download करण्यासाठी Click Here

rabbit farm

कसा सुरु केला ससे पालनाचा व्यवसाय?

इंजिनियरिंगचा शिक्षण घेतलेल्या निलेशने ससे पालन व्यवसाय सुरु करण्यापूर्वी या व्यवसायाबद्दल हरियाणामध्ये जाऊन यासाठी ट्रेनिंग घेतले आणि पूर्ण माहिती घेतली. सशांचे संगोपन कशा प्रकारे केले जाते? किती पैसे गुंतवावे लागतात? याची माहिती निलेशने घेतल्यानंतर सुरुवातीला 6 प्रजातीचे 200 ससे घेतले. त्यातून त्यानेहि ससे पालनाचा व्यवसाय सुरु केला.

rabbit 04

किती आला एकूण खर्च?

ससे पालनासाठी निलेशला 3 लाख 50 हजार रुपये इतका खर्च आला. शेड उभारण्यासाठी 2 लाख 50 हजार असे एकूण 6 लाखात त्यांनी हा व्यवसाय सुरु केला आहे. त्यासाठी हरियाणामधून 6 प्रजातीचे ससे आणले आहेत. निलेशला मुंबईत नोकरी लागली होती. मात्र, ती नोकरी सोडून निलेशने कोरोना काळात घरी येऊन ससे पालनाचा व्यवसाय सुरु केला.

rabbit

सशाच्या मटणाला आहे मोठी मागणी

निलेशने सुरु केल्या ससे पालनातील व्यवसायात त्याला चागला फायदा आहे हे त्याने त्याचा ओळखले होते. कारण सशाच्या मटणाला सिंधुदुर्ग जवळील गोव्यात मोठी मागणी आहे. याचे पांढर मटण असते. यामध्ये प्रोटीन आणि विटामिन खूप आहेत. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने ते महत्वाचे मानले जाते. यामुळे याला चांगली मागणी असते.

rabbit

तब्बल 600 रुपये किलोने सशाच्या मटणाची विक्री

निलेश केवळ ससे पालनाचा व्यवसाय करत नाही तर त्याच्याशी निगडित असलेल्या अनेक गोष्टी ते करतात. आणि त्यातून पैसे कमवत आहेत. ससे पाळण्यासाठी ते 450 रुपयाला सशाची विक्री करतात. तर सशाचे मटण 600 रुपये किलोने विकतात. त्यामुळे त्यांना महिन्याकाठी 80 ते 90 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. ससे पालनासाठी 5 से. ते 35 से. तापमान त्यांना आवश्यक असते. ते कोकणात आहे.

Nilesh Gosavi

ससे पालनासाठी घेतात या गोष्टींची काळजी

ससे पालन करताना खूप काळजी घावी लागते. कारण सशांना कोणताही संसर्गिग रोग होऊ नये याची काळजी घ्यावी लागते. त्यांना खाद्य म्हणून गहू, मका, सोयाबीन यांचा भरड, कोबी आणि फ्लॉवरची पान हा चारा दिला जातो. ससाची विष्टा ही ऑरगॅनिक खत म्हणून वापरु शकतो. याला देखील मोठी मागणी असते. तसेच सशाचं मूत्र मिरजमधील द्राक्ष बागायदार घेऊन जातात. हे मूत्र कीटकनाशक म्हणून वापरतात. तर मूत्र 10 रुपये लिटर तर पेंडीची 20 रुपये किलो विक्री होते.