रेशीम शेतीतून पठ्ठ्यानं 15 महिन्यांमध्ये घेतलं 23 लाख उत्पन्न ; रेशीमरत्न पुरस्काराने गौरव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : आज अनेक तरुण महाविद्यालय शिक्षण करत असताना घरची शेती पाहत आहेत. अशा तरुणांमध्ये कुणाला शिकून नोकरी करायची आहे तर कुणाला उत्तम शेतकरी व्हायचे आहे. उत्तम शेती करण्यासाठी त्यातील कौशल्यही हवी असावी लागतात. त्या कौशल्याच्या साहाय्याने आपण चांगले उत्पन्न घेऊ शकतो. आज आपण एका पंचवीस वर्षाच्या तरुण शेतकऱ्याने केलेल्या रेशीम शेतीबद्दल जाणून घेणार आहोत. कि त्याने 15 महिन्यांमध्ये 23 लाख उत्पन्न कशाप्रकारे मिळवले कि त्याचा रेशीमरत्न पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे.

जालना जिल्ह्यातील मच्छिंद्रनाथ चिंचोली गावात राहणाऱ्या भाऊ निवदे या 25 वर्षाच्या तरुणाने शिक्षणाबरोबर रेशीम शेती करून चांगले उत्पन्न कमवले आहे. भाऊने रेशीम कोषाच्या विक्रीतून विक्रमी उत्पन्न काढत शासनालाही आश्चर्य चकीत केले आहे. लष्करात भरती होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भाऊने शेतीकडे वळत रेशीम शेतीतून उत्तम शेतीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.

शेतकरी मित्रांनो आज शेती करत असताना त्याबरोबर जोडव्यवसायही करून आपण चांगले पैसे कमवू शकतो. तुम्हालाही रेशीम शेतीद्वारे भरघोस उत्पन्न मिळवायचे असेल तर काळजी करू नका. हॅलो कृषी हे ॲप मोबाईलमध्ये आजच install करा. हॅलो कृषीच्या माध्यमातून तुम्ही अनेक प्रकारचे शेतीशी निगडित अशा पूरक व्यवसायाची माहिती घेऊ शकता. याशिवाय अनेक योजनांची माहितीही मिळवू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा. App ओपन होताच तुम्हाला शेतीही निगडी अशा व्यवसायाची माहिती दिसेल. Hello Krushi मध्ये तुम्हाला बाजारभाव, शेतजमीन मोजणी, सातबारा उतारा, हवामान अंदाज यांसारख्या अनेक सुविधा सुद्धा पहायला मिळतील.

हॅलो कृषी डाउनलोड करण्यासाठी Click here 

Bhau Nivde

कशी केली रेशीम शेतीस सुरुवात?

भाऊ निवदे या तरुणाने आपले बी. कॉम शिक्षण पूर्ण करत असताना सुरुवातीला सैन्यदलात जाण्याचा विचार केला. 3 ते 4 वर्षं तयारीही केली. सात ते आठ वेळा भरतीत सहभागीही झाला. पण त्यात त्याला काही यश आले नाही. भरतीचा सराव करताना त्याला गावातीलच ज्ञानदेव बिडवे यांनी रेशीम कोषासाठी उभारलेले शेड दिसले. त्याठिकाणी जाऊन त्याने रेशीम शेतीबाबत माहिती घेतली. त्यातून त्याने आपणही रेशीम शेती करायची हे ठरवले. आणि 30 गुंठ्याचे क्षेत्र असलेल्या घरच्या शेतीत रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला.

Bhau Nivde

अशा प्रकारे केले तुती लागवडीचे नियोजन

रेशीम शेती करायची ठरवल्यानंतर भाऊने गावातील असलेल्या ज्ञानदेव बिडवे यांच्या शेतातून तुतीच्या काड्या आणल्या. आणि त्यांची सरी पद्धतीने सुरुवातीला लागवड केली. पुढे लावलेली रोपं 3 महिन्यांची झाल्यानंतर 25 जून 2018 मध्ये संपूर्ण एक एकरात तुतीची लागवड केली. लागवड केल्यानंतर अडीच महिन्यांनी पहिली बॅच आली, ती 125 अंडीपुंजाची होती. त्यापासून 120 किलो उत्पन्न झाले. त्यातून 60 हजार रुपये मिळाले. पहिली बॅच यशस्वी झाल्यानंतर पुढे थेट 1 एकर क्षेत्रात तुती लागवड करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर पुढे जाऊन 2021 पर्यंत भाऊकडे 4 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली.

रेशीम शेती

महिन्याला घेत असलेल्या बॅचमध्ये 400, 500 किंवा 600 अंडीपुंज्याची असत. आणि प्रत्येक बॅचला चार, साडे चार किंवा पाच क्विंटल असा माल निघायचा. सुरुवातीला 50 हजार आणि मग उन्हाळ्यात 70 ते 80 हजारापर्यंत जालना मार्केटला कोषाचे भाव गेले. त्यापासून प्रत्येक बॅचला 1 लाख 80 हजार, 2 लाख किंवा अडीच लाख रुपये मिळत. एकंदरीत सर्व एकत्रित केल्यानंतर 23 लाख रुपये उत्पादनझाले. त्यातून 15 महिन्यांमध्ये 13 बॅच पूर्ण करून त्यापासून 23 लाख उत्पन्न कमवता आले.

Bhau Nivde

शासनाकडून रेशीमरत्न पुरस्काराने गौरव

एका ग्रामीण भागातील तरुणाने आपल्या कौशल्याच्या जोरावर अत्यन्त चांगल्या पद्धतीने रेशीम शेती केली. 1 मार्च 2021 ते 15 सप्टेंबर 2022 पर्यंत भाऊने 23 लाख रुपयांच्या रेशीम कोषचे उत्पादन घेतल्याने याची दखल थेट नागपूर येथील रेशीम संचालनालयाने घेतली. आणि विक्रमी उत्पादनाबद्दल त्यांचा रेशीमरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. भाऊकडून दर महिन्याला अंडीपुज्याची बॅच घेतली जाते. रेशीम शेतीतून 15 महिन्यांमध्ये 23 लाख उत्पन्न कमवले.

Bhau Nivde

रेशीम लागवड करताना ‘या’ गोष्टींची घेतली काळजी

रेशीम शेतीमध्ये दोन गोष्टींची काळजी घेतल्याचे भाऊ सांगतात. पहिली गोष्ट म्हणजे शेडचे वातावरण व्यवस्थित टिकवून ठेवणे आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुतीच्या पाल्याची गुणवत्ता चांगली ठेवणे हे होय. शेडचं वातावरण मेंटेन राहण्यासाठी आतमध्ये 6 फॅन लावलेले. दोन कुलर आणि ग्रीन नेटला दोन इन-लाईन ठिबकच्या नळ्या शिवल्या. त्याच्यामुळे ग्रीन नेटवर पाणी कंटिन्यू 10 तास चालू राऊ लागले. त्यासोबत बाहेरून येणाऱ्या हवेमुळे वातावरण थंड राऊ लागले आणि शेडचे वातावरण 27 C राहिले. शेडमधील भिंत पूर्ण ओली राहत असल्यामुळे आर्द्रता टिकून राहू लागली.

reshim

रेशीम शेतीसाठी शासनाकडून अनुदान

रेशीम शेतीसाठी अनुदानाविषयी सांगायचे झाले तर महाराष्ट्राच्या रेशीम संचालनालयाकडून अनुदानही दिले जाते. महाराष्ट्र सरकारची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून तुती लागवड ही 3 लाख 42 हजार रुपयांची योजना आहे. त्यामुळे शासनाकडून मिळालेले पैसे हे मजुरीचे असतात आणि पिकातून निघालेले पैसे हे पूर्णपणे बोनस असतात. महाराष्ट्रात सर्वाधिक रेशीम शेती मराठवाड्यात केली जातो. त्याखालोखाल पुणे आणि नागपूर विभागाचा क्रमांक लागतो. सध्या राज्यात जवळपास 14 हजार एकर क्षेत्रावर रेशीम शेती केली जात आहे. दरवर्षी 7 हजार एकर क्षेत्र तुतीच्या लागवडीखाली येत आहे.

रेशीम उद्योगातून इतर फायदे –

1. रेशीम अळयांची विष्ठा दुभत्या जनावरांना सुग्रास प्रमाणे खाद्य म्हणून वापरता येते. यातून 1 ते दीड लिटर दूध वाढते.

2. वाळलेला पाला व विष्ठेचा गोबरगॅस मध्ये उपयोग करुन उत्तम प्रकारे गॅस मिळतो.

3. तुतीच्या वाळलेल्या इंधन म्हणून वापरता येतात. तसेच खत म्हणून सुध्दा वापरता येते.

4. संगोपनात वापरलेल्या चोथा करुन त्यावर अळींबीची लागवड करता येते व त्यानंतर चोथ्यापासून गांडूळ खत करता येते.

5. रेशीम उद्योगापासून देशाला परकीय चलन मिळते व देशाच्या विकासात हातभार लागतो.

6. तुतीची दरवर्षी तळ छाटणी करावी लागते .या छाटणी पासून मिळणारी तुती कोश शासना मार्फत खरेदी केली जातात. त्यामुळे एकरी 3 हजार 500 ते 4 हजार 500 रुपये जास्तीचे उत्पन्न प्रतीवर्षी मिळते.

7. तुतीच्या पानांमध्ये व ये जीवनसत्वाचे प्रमाण बरेच आढळते. त्यामुळे तुतीचा पाला व रेशीम कोश प्युपा आर्युवेदीक दश्ष्टया महत्वाचा आहे.

8. विदेशात तुतीच्या पानांचा चहा मलबेरी टी करतात. शिवाय वाईन करतात.

9. कोश मेलेल्या प्युपाचा आयुर्वेदीक औषधे व सौंदर्य प्रसाधनात उपयोग करता येतो.