दगडुशेठला हात जोडले की, भिडे वाड्याला पाठ होते; तरुणीची फेसबुक पोस्ट व्हायरल

dagdusheth temple pune
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विचार तर कराल : सध्या सर्वत्र गणेशोत्सव आनंदाने साजरा केला जात आहे. गावागावात गणेशमंडळांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण दिसत आहे. पुण्यात गणेशोत्सवामुळे सर्वच पेठा अगदी दणाणून निघाल्या आहेत. पहावं तिकडे गणेशाच्या दर्शनासाठी गर्दी लोटताना दिसते आहे. अशात एका तरुणीची भिडेवाड्यावरील फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. दगडुशेठला हात जोडले की, भिडे वाड्याला पाठ होते या दोन ओळींनी या तरुणीने चपराक दिली आहे.

दोन दिवसांपूर्वीच पुण्यातील दगडूशेठला हजारो महिलांनी एकत्रीत येत एकाचवेळी अथर्वशीर्ष म्हणुन एक विक्रम केला. मात्र ज्यांनी मुलींसाठी देशातील पहिली शाळा सुरु केली त्या ज्योतिबा फुले अन सावित्रीबाई यांच्या भिडेवाड्याकडे समाजाचे दुर्लक्ष होत आहे. दगडूशेठ गणपती समोरच असलेल्या फुलेंनी सुरु केलील्या मुलींच्या पहिल्या शाळेची अवस्था दैनिय झाली असून दुरावस्था झाली आहे. पुण्यात राहणार्‍या काही महिलांना तर ही शाळा कुठंय, भिडेवाडा काय? हे सुद्धा माहित नाही. याच पार्श्वभूमीवर योगेश्वरी नावाच्या तरुणीची एक फेसबुक पोस्ट जोरदार चर्चेत आली आहे.

योगेश्वरी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणते, आज मैत्रीण विचारत होती की, दगडूशेठला येणार का ग! मी तिला विचारले की,तुला माहीत आहे का ग भिडेवाडा कुठे आहे म्हणून.तर ती मला म्हणाली की काय आहे भिडेवाडा? माझ्या डोक्यात एवढी सनक गेली ना….जिथे मुलींची पहिली शाळा चालू झाली तो भिडेवाडा नाही माहीत हिला. पण नंतर लक्षात आलं,त्या बिचारीची काही चूक नाही.चूक तर ह्या व्यवस्थेची आहे.

जास्त काही बोलत नाही.फक्त एवढंच म्हणेल की,

दगडुशेठला हात जोडले की,
भिडे वाड्याला पाठ होते…!

हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला हवं!