औरंगाबादमध्ये वर्षीय तरुणाची रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या, नातेवाईकांनी केला घातपाताचा आरोप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी । शहरातील गांधीनगर भागात राहणाऱ्या एका २६ वर्षीय तरुणाने रेल्वे समोर उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. या युवकाचे धड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र या तरुणाचं मुंडक गायब असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मात्र ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

शहरातील गांधीनगर रविवार बाजार परिसरात राहणाऱ्या चंद्रकांत सुरज जाधव वय २६ वर्ष याला लहान भाऊ प्रकाश याने मंगळवारी संध्याकाळी ६ वाजता छावणी येथे राहत असलेल्या बहिणीकडे सोडले होते. बहिणीकडे रात्री जेवण करून घरी काम असल्याचे सांगून निघालेल्या चंद्रकांतचा संशय स्पद मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी सकाळी ६ वाजता पोलिसांच्या निर्देशनास आली. या प्रकरणी पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांना माहिती दिली आणि पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले.

मात्र ठाण्यात आल्यावर नातेवाईकांनी तो आत्महत्या करू शकत नसल्याचे सांगून त्याच्यासोबत घातपात झाल्याचे संशय व्यक्त केला आहे. चंद्रकांतच धड सापडले असून मुडके सापडले नसल्याने हा नर बळीचा प्रकार देखील असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे यांनी आम्ही या पूर्ण तपास करत आहोत. तसेच गायब असलेल्या मुडक्याचा शोध सुरु असून हा घातपात नसून आत्महत्या असल्याचे सांगितले आहे.

Leave a Comment