Wednesday, February 8, 2023

कौटुंबिक वादातून तरुणाची हर्सूल तलावात उडी घेऊन आत्महत्या

- Advertisement -

औरंगाबाद | कौटुंबिक वादातून घराबाहेर पडलेल्या तरुणाचा मृतदेह हर्सूल तलावात आढळल्याने कुटुंबीयांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. घरामध्ये वाद झाल्यामुळे सौरभ हा रागाच्या भरात घराबाहेर पडला सर्वत्र कुटुंबांनी त्याचा शोध घेतला मात्र तो कुठेही आढळला नाही. मोबाईल आणि चप्पल घरीच ठेवून गेल्याने तो परत येईल या आशेवर सौरभचे कुटुंबीय होते. मात्र दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह हर्सृल तलावात पाहिल्याने त्यांना खूप मोठा धक्का बसला आहे.

सौरभ शंकर पद्याने, वय 21 (रा. शिवाजी नगर ,जळगाव रोड) आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. सौरभ हा मेडिकल दुकानात काम करत होता. तो बीएससीच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. तो पुढे फार्मसीचे शिक्षण घेणार होता. संपूर्ण कुटुंबांमध्ये अत्यंत समजूतदार होता प्रत्येक अडचणीत मदत करणारा तरुण म्हणून त्यांची ओळख होती. तसेच घरासमोर रांगोळी काढणे, दर शनिवारी भद्रा मारुतीचे दर्शनासाठी जाणे, सोमवारी पारदेश्वर च्या दर्शनासाठी जाणे. त्याला एक छोटा आणि मोठा भाऊ आहे त्याचे वडील खाजगी शाळेत शिक्षक आहेत.

- Advertisement -

दरम्यान, सोमवारी रात्री सौरभचा कुटुंबीयांशी काही कारणामुळे वाद झाला होता. त्यानंतर तो अनवानी पायाने रात्री घराबाहेर पडला. त्याने मोबाईल घरी सोडला होता त्यामुळे घरच्यांना वाटत होते की तो परत येईल. त्यानंतर सकाळी सव्वादहाच्या सुमारास त्यांचा मृतदेह हर्सूल तलावात आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह त्याला बाहेर काढला. त्यानंतर पोलिसांनी त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला याप्रकरणी हर्सृल ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.